सेम टू सेम.! काय तो पेहराव, काय तो अभिनय, सगळंच एक नंबर.; 'धर्मवीर 2' मधील मंत्री शंभूराज देसाई, शहाजी बापूंचा लूक चर्चेत.
'धर्मवीर' आनंद दिघे यांच्यावर असलेल्या या चित्रपटानं लोकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर आता 'धर्मवीर 2' प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
सध्या सगळीकडे याच सिनेमाची हवा पाहायला मिळत आहे. तिकीट बारीवर देखील चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला आहे.
यंदा हा चित्रपट मराठी सोबतच हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेता प्रसाद ओक पुन्हा एकदा 'धर्मवीर' आनंद दिघे यांच्या भूमिकेत दिसला आहे. तर प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मुळात 'धर्मवीर 2' हा सिनेमा आनंद दिघे यांच्या जीवनात असला तरी, यंदा सिनेमात त्यांचे शिष्य आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव जास्त पाहायला मिळतोय.
त्यामुळे चित्रपटात शिवसेनेत झालेल्या बंडाळीचीही दखल घेण्यात आली असून एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुनच हे बंड केल्याचं चित्रपटात दिसत आहे. या बंडाचा सीन चित्रपटात घेण्यात आलाय. त्यामुळे, शिंदेंसह सूरतमार्गे गुवाहटी गाठलेल्या 40 आमदारांपैकी काही आमदारांच्याही भूमिका चित्रपटात साकारण्यात आल्या आहेत.
गुहावटीला गेल्यानंतर तिथलं वर्णन काय झाडी काय डोंगर काय हॉटेल… असं एका कार्यकर्त्याला सांगतानाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि शहाजी बापू पाटील चर्चेत आले. शहाजी बापू पाटील यांची भूमिका अभिनेता आनंद इंगळे यानं साकारली आहे. खऱ्या शहाजी बापू पाटलांनाही आनंद इंगळेला पाहिल्यानंतर आश्चर्य वाटलं असणार, इतपत त्याचा लुक खरा वाटतोय. तर, मंत्र्यांच्या देखील भूमिका सिनेमात अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहे.
अभिनेता आनंद इंगळे यांनी शहाजी बापूंची भूमिका केलीय. शहाजी बापूंसारखी तब्येत, हलकीशी दाढी, थोडसं टक्कल आणि कपाळावर टीळा दिसून येतोय. त्यामुळे,’ धर्मवीर 2′ सिनेमात शहाजी बापूंचा डिक्टो रोल साकारल्याचं दिसून येतंय. काय तो पेहराव, काय तो अभिनय, सगळंच एक नंबर… असे म्हणत नेटीझन्सकडून आनंद इंगळे यांनी साकारलेल्या शहाजी बापूंच्या भूमिकेचं स्वागत केलं जातंय.
तसेच, मंत्री शंभूराज देसाई यांची भूमिका अभिजीत थीटे या अभिनेत्यानं साकारली आहे. शंभूराज देसाई यांचं जॅकेट, त्यांच्या कपाळावरचा टिळा. त्यांचा हेअरकट या गोष्टी अगदी सारख्या केल्यामुळं सिनेमातले शंभूराज देसाईही चर्चेचा विषय ठरतात.नेटीझन्सकडून अभिजीत थीटे या अभिनेत्यानं साकारलेल्या शंभूराज देसाईच्या भूमिकेचं स्वागत केलं जातंय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा