गुरुवार, १४ मार्च, २०२४

आचरेवाडी येथील मनमानी करणाऱ्या रेशनिंग दुकानदाराची चौकशी करून कारवाई करावी, तहसीलदार यांच्याकडे केली मागणी .

 आचरेवाडी येथील मनमानी करणाऱ्या रेशनिंग दुकानदाराची चौकशी करून कारवाई करावी, तहसीलदार यांच्याकडे केली मागणी .


ढेबेवाडी
       आचरेवाडी येथील दुकानदार अनेकांना स्वस्त धान्यापासून वंचित ठेवत असून, यामध्ये मोठा गफला करीत आहे.याशिवाय मुद्दामहून राजकारण केले जात आहे. लोकांची नावे रेशनिंग कार्ड मध्ये बसविण्यासाठी तसेच नविन कार्ड काढण्यासाठी लोकांच्याकडून दुकानदाराने पैसे घेतले आहेत. अशी मनमानी करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा वंदनाताई आचरे यांनी केली आहे.
   आचरेवाडी येथील रेशनिंग दुकानदाराच्या मनमानी विरुद्ध लोकांची तक्रार तहसीलदार व संबंधित विभागाकडे श्रीमती वंदनाताई आचरे यांनी दिली यामध्ये असे म्हंटले आहे. दुकानदार  गोरगरीब जनतेला मुद्दामहून स्वस्त धान्यापासून वंचित ठेवत आहे व मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्याचा गफला करत आहे. दुकानदार पूर्ण राजकीय हेतूने वागत असून आम्हाला तुमच्याकडे गाडी असल्याने तुम्हाला धान्य देता येत नाही तुमची आर टी ओ  मार्फत चौकशी होईल अशी भीती दाखवत असून काही लोकांच्या भीतीपोटी फसवून सह्या ही घेतल्या आहेत. तर दुकानदाराच्या बरोबर राजकीय पार्टीत काम करणाऱ्या अनेकांची नावे ज्यांच्या नावे गाड्या आहेत जी सधन कुटुंबातील आहेत त्यांना धान्य दिले जात आहे. सगळ्यांनसाठी एकच न्याय का नाही असा प्रश्न असून आम्हालाच असा त्रास का दिला जातोय याबत दुकानदाराला विचारणा केली असता तो आम्हास उद्धट उत्तर देत आहे व माझ कोणी काय करू शकत नाही असे म्हणत आहे. रेशनिंग दुकानदार पुरवठा विभागातील काही लोकांच्या संगमताने अशी भाषा करीत असून तसे तो मुद्दामपणाने बोलतही आहे. याअगोदर दुकानदाराची चौकशी होवून त्याच्यावर मोठी कारवाई झाली आहे पण त्याच्यामध्ये कोणतीही सुधारणा नाही.परत मागचं तेच पुढं चालू असून भ्रष्ट काम चालूच आहे. या दुकानात येणारे धान्य किती व लाभार्थी किती तसेच त्याचे होणारे वितरण तसेच अंत्योदय लाभार्थी याची आम्हास माहिती मिळावी अशी आमची मागणी आहे. बरेचसे धान्याचा काळा बाजार केला जात आहे.त्याची चौकशी व्हावी, तसेच गरजू आणि राजकीय हेतूनी ज्या गरिबांना स्वस्त धान्यापासून वंचित ठेवले जात आहे, त्यांना धान्य मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे.



बुधवार, १३ मार्च, २०२४

पोलीस पाटील, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव वाढ, राज्य सरकारची मोठी घोषणा.

पोलीस पाटील, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव वाढ, राज्य सरकारची मोठी घोषणा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

पोलीस पाटील यांना यापुढे 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर आशासेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरीव वाढ करण्यात आली आहे.

ज्या गावांमध्ये पोलीस ठाणे नसते, त्या गावांमध्ये पोलीस पाटलांची नियुक्ती केली जाते. गावातील भांडण, हाणामाऱ्या आणि वादविवाद मिटवण्यासाठी पोलीस पाटील हे महत्वाची भूमिका बजावतात. पूर्वी पोलीस पाटलांना साडेसहा हजार रुपये मानधन मिळत होते.

अनेक वर्षे पोलीस पाटलांचे मानधन 3 हजार रुपये होते. मात्र 2019 मध्ये त्यात वाढ केली होती. ते मानधन 6 हजार 500 इतके होते. पण आता पोलीस पाटील यांच्या मानधनात मोठी वाढ केली आहे. आता त्यांना 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे. तर आशासेविकांच्या मानधनात देखील पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

मंगळवार, १२ मार्च, २०२४

कुंभारगाव - प्रा राहुल यादव यांना अर्थशास्त्र या विषयात पीएचडी पदवी जाहीर.

प्रा. राहुल यादव रा.चिखलेवाडी (कुंभारगाव) सध्या के.सी.कॉलेज,तळमावले ता पाटण याठिकाणी अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन करीत आहेत .यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मानव्य विद्याशाखेअंतर्गत अर्थशास्त्र या विषयात पीएचडी पदवी नुकतीच जाहीर करण्यात आली.
प्रा. राहुल यादव यांनी "अ कॉझल ॲनालिसीस ऑफ चेंजिंग पब्लिक एक्सपेंडिचर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया" या विषयावर शोध प्रबंध सादर केला. त्यांना अर्जुननगर येथील देवचंद कॉलेज मधील अर्थशास्त्र अधिविभागातील प्रा. डॉ. राजकुमार वाईंगडे यांचे मार्गदर्शन लाभले. या पीएचडी संशोधनकार्यात त्यांना कै. जे. एफ. पाटील, प्रा. डॉ. संतोषकुमार यादव, मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे (कार्याध्यक्ष, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर), मा. सौ. शुभांगीताई गावडे (सचिव, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर), मा. कौस्तुभ गावडे (मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) व प्राचार्य डॉ. अरुण गाडे (काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले) यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन. स्व. यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ उर्जा व प्रेरणा स्त्रोत - उपमुख्यमंत्री अजित पवार.

 स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन.

स्व. यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ उर्जा व प्रेरणा स्त्रोत - उपमुख्यमंत्री अजित पवार


 


सातारा, दि. 12 :
स्व. यशवंतराव चव्हाण यांचे प्रितीसंगमावरील समाधीस्थळ उर्जा व प्रेरणा स्त्रोत आहे. शासनाच्या माध्यमातून लोकहिताचे काम करीत असताना असे उर्जा व प्रेरणा स्त्रोत सहायभूत ठरतात. महाराष्ट्राच्या जडण घडणीत स्व. यशवंतराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यामुळे आज महाराष्ट्र कृतिशील  व प्रगल्भ महाराष्ट्र घडला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कराड येथे आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठान कराडतर्फे स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींची शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुनिल तटकरे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कामामुळेच शेती, व्यापार, आरोग्य, शिक्षण, सहकार यासह अनेक क्षेत्रात महाराष्ट्राचा पाया भक्कम उभा आहे. राजकारण, समाजकारण त्यांनी वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले. त्यांची नाळ शेवटपर्यंत जनतेशी जोडली गेली होती.  राजकारणावर त्यांचा वेगळा ठसा व प्रभाव होता. दिल्लीतील त्यांचं घर उभ्या महाराष्ट्राला आपलसं वाटत होते, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

प्रीती संगमावरील समाधीस्थळी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

 स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनानमित्त कराड येथील प्रितीसंगमावरील समाधी स्थळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवान केले. यावेळी त्यांच्या समवेत विविध मान्यवर उपस्थित होते.

युरियासह डीएपीचा संरक्षित साठा करावा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

 


मुंबई, दि. 11 : राज्यात आगामी खरीप हंगामाच्या कालावधीत युरिया व डीएपी खतांचा तुटवडा भासू नये या दृष्टीने युरिया व डीएपीचा संरक्षित साठा करण्यात यावा, अशा सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या

सन 2024 च्या खरीप हंगामामध्ये युरिया व डीएपी खताचा संरक्षित साठा करण्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे अरुण दलाल, महाराष्ट्र कृषी व उद्योग विकास महामंडळाचे महेंद्र बोरसे तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री. मुंडे म्हणाले की, खरीप हंगामातील जून व जुलै महिन्यात युरिया व डीएपी खतांची आवक मागणीपेक्षा कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे संभाव्य तुटवडा भासू नये म्हणून संरक्षित साठा करावा.

एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीतील दीड लाख टन व 0.25 लाख मीटर डीएपी खताचा संरक्षित साठा राज्यामध्ये करण्यासाठी नोडल एजन्सींना खत साठवणूक, वाहतूक विमा खताची चढाई उतराई, जीएसटी सेवा शुल्क इत्यादी अनुषंगिक खर्चासाठी निधीची तरतूद करण्यात येईल. संरक्षित साठा करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन या संस्थांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशाही सूचना कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी दिल्या.

रविवार, १० मार्च, २०२४

पाटण येथील जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

पाटण येथील जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
आज पाटण मध्ये पालकमंत्री मां ना शंभूराज देसाई यांचे अध्यक्षते खाली आयोजित जनता दरबारास उन्हाचा कडाका असूनही  नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आहे. या जनता दरबारात मध्ये 3 तासात  एकूण 507  नागरिकांनी आपले अर्ज सादर केले आहे . यामध्ये काही अर्जदार यांनी पालकमंत्री  शंभूराज देसाई यांची समक्ष भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या आहेत.
जनता दरबारात प्राप्त झालेल्या 507  अर्जाची ऑनलाईन नोंदणी करून त्यांना टोकण नंबर देखील देण्यात आले आहे. त्यानंतर 
विभाग निहाय सर्व अर्जाची वर्गवारी करून सदर अर्जावर करण्यात आलेल्या  कार्यवाही बद्दल संबंधित अर्जदार तसेच मां पालकमंत्री श्री शंभूराज देसाई यांचे कार्यालयास देखील  माहिती देण्यात येणार आहे.  जनता दरबारात प्राप्त होणाऱ्या सर्व अर्जावर तातडीने सर्व संबंधित अधिकारी यांनी कार्यवाही करण्याच्या सुवलचाना पालकमंत्री श्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत.
जनता दरबार व शासन आपल्या दारी या दोन्ही संकल्पना एकत्रित करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने जनता दरबाराच्या आयोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी सातारा व स्थानिक महसूल प्रशासनाचे कौतुक केले आहे.

चौकट 
 सदर जनता दरबार मध्ये अर्ज देण्यासाठी गर्दी वाढल्याने व लोकांना जास्त वेळ  थांबावे  लागू नये म्हणून प्रांत अधिकारी सुनील गाढे यांनी स्वतः टेबल वर  बसून काही अर्जाची नोंदणी केली तसेच नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.

या कार्यक्रमादरम्यान जनतेचे म्हणने एकूण घेण्या बरोबरच अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल चे वाटप करण्यात आले, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मंजुरीचे पत्र देण्यात आले.तसेच काही दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप करण्यात आले. शिधापत्रिका चे देखील वाटप करण्यात आले.कातकरी बांधवांना धान्याचे वाटप करण्यात आले.
चौकट 
कार्यक्रम संपल्यानंतर अशाच एका दीव्यांग  बांधवाला  वाटप केलेली नवीन तीन चाकी सायकल व्यवस्थित चालविता येत नसल्याने त्याला पंचायत समितीच्या प्रवेशद्वार पर्यंत स्वतः पोहोच करून प्रांताधिकारी सुनील गाढे व  तहसीलदार अनंत गुरव यांनी संवेदनशीलतेचा प्रत्यय दिला आहे.

जनता दरबार मध्ये प्राप्त झालेल्या 507 अर्जाची नोंदणी करून त्याची विभाग निहाय वर्गवारी करून संबंधित विभागाकडे ते पुढील कार्य वाही साठी तत्काळ पाठविण्यात येणार असून अशा अर्जावर संबंधित विभागाने  तातडीने कार्ये वाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सातारा श्री जितेंद्र डूडी यांनी दिल्या आहेत.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे समवेत रविराज देसाई, यशराज देसाई तसेच जिल्हाधिकारी सातारा श्री जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याषणी नागराजन ,अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल, पोलीस अधीक्षक समीर शेख , वन विभागाच्या आदिती भारद्वाज ,प्रांताधिकारी सुनील गाढे , कराडचे प्रांताधिकारी अतुल मेहेत्रे पोलीस उपअधीक्षक सविता गर्जे, तहसीलदार अनंत गुरव , गट विकास अधिकारी श्री गोरख शेलार,  तालुका कृषी अधिकारी  श्री माळवे  तसेच जिल्हा स्तरावरील विविध विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.
सदर जनता दरबार यशस्वी होण्यासाठी. तहसीलदार अनंत गुरव व महसूल कर्मचारी तलाठी मंडळ अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

सोमवार, ४ मार्च, २०२४

मागेल त्याला शेततळे योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन.

 मागेल त्याला शेततळे योजनेचा  शेतकऱ्यांनी  लाभ घेण्याचे आवाहन.


 मागेल त्याला शेततळे योजनेचा  शेतकऱ्यांनी  लाभ घेण्याचे आवाहन.


 

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...