पोलीस पाटील, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव वाढ, राज्य सरकारची मोठी घोषणा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
पोलीस पाटील यांना यापुढे 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर आशासेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरीव वाढ करण्यात आली आहे.
ज्या गावांमध्ये पोलीस ठाणे नसते, त्या गावांमध्ये पोलीस पाटलांची नियुक्ती केली जाते. गावातील भांडण, हाणामाऱ्या आणि वादविवाद मिटवण्यासाठी पोलीस पाटील हे महत्वाची भूमिका बजावतात. पूर्वी पोलीस पाटलांना साडेसहा हजार रुपये मानधन मिळत होते.
अनेक वर्षे पोलीस पाटलांचे मानधन 3 हजार रुपये होते. मात्र 2019 मध्ये त्यात वाढ केली होती. ते मानधन 6 हजार 500 इतके होते. पण आता पोलीस पाटील यांच्या मानधनात मोठी वाढ केली आहे. आता त्यांना 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे. तर आशासेविकांच्या मानधनात देखील पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा