आचरेवाडी येथील मनमानी करणाऱ्या रेशनिंग दुकानदाराची चौकशी करून कारवाई करावी, तहसीलदार यांच्याकडे केली मागणी .
ढेबेवाडी
आचरेवाडी येथील दुकानदार अनेकांना स्वस्त धान्यापासून वंचित ठेवत असून, यामध्ये मोठा गफला करीत आहे.याशिवाय मुद्दामहून राजकारण केले जात आहे. लोकांची नावे रेशनिंग कार्ड मध्ये बसविण्यासाठी तसेच नविन कार्ड काढण्यासाठी लोकांच्याकडून दुकानदाराने पैसे घेतले आहेत. अशी मनमानी करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा वंदनाताई आचरे यांनी केली आहे.
आचरेवाडी येथील रेशनिंग दुकानदाराच्या मनमानी विरुद्ध लोकांची तक्रार तहसीलदार व संबंधित विभागाकडे श्रीमती वंदनाताई आचरे यांनी दिली यामध्ये असे म्हंटले आहे. दुकानदार गोरगरीब जनतेला मुद्दामहून स्वस्त धान्यापासून वंचित ठेवत आहे व मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्याचा गफला करत आहे. दुकानदार पूर्ण राजकीय हेतूने वागत असून आम्हाला तुमच्याकडे गाडी असल्याने तुम्हाला धान्य देता येत नाही तुमची आर टी ओ मार्फत चौकशी होईल अशी भीती दाखवत असून काही लोकांच्या भीतीपोटी फसवून सह्या ही घेतल्या आहेत. तर दुकानदाराच्या बरोबर राजकीय पार्टीत काम करणाऱ्या अनेकांची नावे ज्यांच्या नावे गाड्या आहेत जी सधन कुटुंबातील आहेत त्यांना धान्य दिले जात आहे. सगळ्यांनसाठी एकच न्याय का नाही असा प्रश्न असून आम्हालाच असा त्रास का दिला जातोय याबत दुकानदाराला विचारणा केली असता तो आम्हास उद्धट उत्तर देत आहे व माझ कोणी काय करू शकत नाही असे म्हणत आहे. रेशनिंग दुकानदार पुरवठा विभागातील काही लोकांच्या संगमताने अशी भाषा करीत असून तसे तो मुद्दामपणाने बोलतही आहे. याअगोदर दुकानदाराची चौकशी होवून त्याच्यावर मोठी कारवाई झाली आहे पण त्याच्यामध्ये कोणतीही सुधारणा नाही.परत मागचं तेच पुढं चालू असून भ्रष्ट काम चालूच आहे. या दुकानात येणारे धान्य किती व लाभार्थी किती तसेच त्याचे होणारे वितरण तसेच अंत्योदय लाभार्थी याची आम्हास माहिती मिळावी अशी आमची मागणी आहे. बरेचसे धान्याचा काळा बाजार केला जात आहे.त्याची चौकशी व्हावी, तसेच गरजू आणि राजकीय हेतूनी ज्या गरिबांना स्वस्त धान्यापासून वंचित ठेवले जात आहे, त्यांना धान्य मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
गुरुवार, १४ मार्च, २०२४
आचरेवाडी येथील मनमानी करणाऱ्या रेशनिंग दुकानदाराची चौकशी करून कारवाई करावी, तहसीलदार यांच्याकडे केली मागणी .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !
पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा