आज पाटण मध्ये पालकमंत्री मां ना शंभूराज देसाई यांचे अध्यक्षते खाली आयोजित जनता दरबारास उन्हाचा कडाका असूनही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आहे. या जनता दरबारात मध्ये 3 तासात एकूण 507 नागरिकांनी आपले अर्ज सादर केले आहे . यामध्ये काही अर्जदार यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची समक्ष भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या आहेत.
जनता दरबारात प्राप्त झालेल्या 507 अर्जाची ऑनलाईन नोंदणी करून त्यांना टोकण नंबर देखील देण्यात आले आहे. त्यानंतर
विभाग निहाय सर्व अर्जाची वर्गवारी करून सदर अर्जावर करण्यात आलेल्या कार्यवाही बद्दल संबंधित अर्जदार तसेच मां पालकमंत्री श्री शंभूराज देसाई यांचे कार्यालयास देखील माहिती देण्यात येणार आहे. जनता दरबारात प्राप्त होणाऱ्या सर्व अर्जावर तातडीने सर्व संबंधित अधिकारी यांनी कार्यवाही करण्याच्या सुवलचाना पालकमंत्री श्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत.
जनता दरबार व शासन आपल्या दारी या दोन्ही संकल्पना एकत्रित करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने जनता दरबाराच्या आयोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी सातारा व स्थानिक महसूल प्रशासनाचे कौतुक केले आहे.
चौकट
सदर जनता दरबार मध्ये अर्ज देण्यासाठी गर्दी वाढल्याने व लोकांना जास्त वेळ थांबावे लागू नये म्हणून प्रांत अधिकारी सुनील गाढे यांनी स्वतः टेबल वर बसून काही अर्जाची नोंदणी केली तसेच नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.
या कार्यक्रमादरम्यान जनतेचे म्हणने एकूण घेण्या बरोबरच अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल चे वाटप करण्यात आले, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मंजुरीचे पत्र देण्यात आले.तसेच काही दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप करण्यात आले. शिधापत्रिका चे देखील वाटप करण्यात आले.कातकरी बांधवांना धान्याचे वाटप करण्यात आले.
चौकट
कार्यक्रम संपल्यानंतर अशाच एका दीव्यांग बांधवाला वाटप केलेली नवीन तीन चाकी सायकल व्यवस्थित चालविता येत नसल्याने त्याला पंचायत समितीच्या प्रवेशद्वार पर्यंत स्वतः पोहोच करून प्रांताधिकारी सुनील गाढे व तहसीलदार अनंत गुरव यांनी संवेदनशीलतेचा प्रत्यय दिला आहे.
जनता दरबार मध्ये प्राप्त झालेल्या 507 अर्जाची नोंदणी करून त्याची विभाग निहाय वर्गवारी करून संबंधित विभागाकडे ते पुढील कार्य वाही साठी तत्काळ पाठविण्यात येणार असून अशा अर्जावर संबंधित विभागाने तातडीने कार्ये वाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सातारा श्री जितेंद्र डूडी यांनी दिल्या आहेत.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे समवेत रविराज देसाई, यशराज देसाई तसेच जिल्हाधिकारी सातारा श्री जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याषणी नागराजन ,अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल, पोलीस अधीक्षक समीर शेख , वन विभागाच्या आदिती भारद्वाज ,प्रांताधिकारी सुनील गाढे , कराडचे प्रांताधिकारी अतुल मेहेत्रे पोलीस उपअधीक्षक सविता गर्जे, तहसीलदार अनंत गुरव , गट विकास अधिकारी श्री गोरख शेलार, तालुका कृषी अधिकारी श्री माळवे तसेच जिल्हा स्तरावरील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सदर जनता दरबार यशस्वी होण्यासाठी. तहसीलदार अनंत गुरव व महसूल कर्मचारी तलाठी मंडळ अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा