पारनेर : श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा आज चंपाषष्ठी महोत्सव
शहाजी पुंडे - मुंबई संपादक ; साप्ताहिक "कुमजाई पर्व"
पारनेर, दि.9 डिसेंबर :- लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा ता. पारनेर येथे या राज्यस्तरीय वर्ग तीर्थक्षेत्रावर गुरुवार ९ डिसेंबर रोजी भव्य चंपा षष्टी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.श्री खंडोबा मंदिराचा चंपाषष्ठी ५ डिसेंबर १९९७ रोजी स्वामी गगनगिरी महाराज यांच्या हस्ते सुवर्ण कलशारोहणतीन लाखांवर भाविक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता.तेव्हापासून देवस्थान हा चंपाषष्ठी महोत्सव सुरू झाला.यावर्षी २४ व्या वर्षाचा भव्य चंपाषष्ठी महोत्सव कोरठण गडावर ९ डिसेंबरला साजरा होत आहे.चंपाषष्टीला खंडोबाचा मार्तंड भैरव अवतार प्रकट झाला व त्याने मणी-मल्ल दैत्यांचा संहार केला.सर्व देवदेवतांना वरदान लाभले म्हणुन चंपाषष्टीला महत्त्व आहे.कुल धर्म,कुलाचार,तळी भंडार करण्या ची खंडोबा भक्तांचे प्रथा आहे.या चंपाषष्ठी पर्वणीत दिवसभरात लाखावर भाविक भक्त उपस्थित राहतील असा अंदाज धरुन देवस्थान तर्फे सर्व नियोजन केले आहे.या महोत्सवाच्या निमित्ताने चंपाषष्ठी उत्सव येथील खंडोबा माळसा घोड्यावरील पितळी मूर्ती मंदिराचा ६ वा वर्धापन दिन आणि स्वामी गगनगिरी महाराज मूर्ती ध्यान मंदिर ५ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होईल.
चंपाषष्टी महोत्सवा निमित्त ९ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता खंडोबा उत्सव मूर्तीचे सिंहासनावरन,साज-शृंगार व पूजा व आरती,सकाळी ६ वाजता खंडोबा अभिषेक,पूजा,आरती सकाळी ७ ते ९ होमहवन यज्ञ, सकाळी ८ ते १० शरद भाग वत प्रस्तुत आनंदयात्री भक्ती भजन मंडळ,आळेफाटा यांचे संगीत भजन होईल.तसेच गोरेगाव ग्रामस्थांचा दिंडी सोहळा पिंपळगावरोठा वरून खंडोबा देवस्थानवर येईल.सकाळी ११ पासून महाप्रसाद वाटप सुरू होईल.सकाळी ११ ला गजाजन महाराज काळे यांचे मल्हारी महात्म खंडोबा कथासार यावर सुश्राव्य हरिकीर्तन होईल.दुपारी १ वाजता चांदीच्या पालखीतून शाही रथात चांदीच्या उत्सव मूर्तीची भव्य मिरवणुकीने मंदिर प्रदक्षणा व कोरठण गड प्रदक्षणा होईल.तसेच नानजीभाई ठक्कर यांच्या हस्ते देणगीदारांचा सन्मान होईल.पालखीचे व्यासपीठावर आगमन होऊन मान्यव रांच्या उपस्थितीत चंपाषष्टी उत्सवाची महाआरती होईल.दुपारी १ वाजल्यापासून श्री खंडोबा गाणी स्पर्धा होणार आहे.चंपाषष्ठी उत्सवानिमित्त वाहने पार्किंग खंडोबा फाटा आणि मंदिराच्या पूर्व बाजूला सोय केली आहे.९ डिसेंबरला खंडोबा फाटा ते मंदिर हा १ किलोमीटर रस्ता वाहतुकीस दोन्ही बाजूने बंद राहील.चंपाषष्ठीला पारनेर पोलीस,अहमदनगर पोलीस मित्र संस्था यांचा बंदोबस्त ठेवण्यात आले.जय मल्हार विद्यालयाचे विद्यार्थी,आळकुटी महाविद्यालयाचे विद्यार्थी,क्रांती शुगर कारखाना सुरक्षा पथक स्वयंसेव क म्हणून सेवा करणार आहे.देवस्थान तर्फे पिण्याचे पाणी दर्शन व्यवस्था वाहने पार्किंग इत्यादी बाबींचे नियोजन करण्यात आलेले आहे.या चंपाषष्टी महोत्सव उपस्थित राहून भाविक भक्त जनतेने कुलदैवत स्वयंभू श्री खंडोबा चंपाषष्ठी,महाप्रसाद आणि खंडोबा माळसा घोड्यावरील भव्य पितळी मूर्ती मंदिर,स्वामी गगनगिरी महाराज मूर्ती ध्यानमंदिर,शाही रथ पालखी सोहळा याचा दर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन देवस्थान तर्फे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड पांडुरंग गायकवाड यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा