धामणी ग्रामपंचायतीचा पुढाकार - *स्वच्छ धामणी सुंदर धामणी* *परिवर्तन घडतेय, गाव सुंदर होतेय*
धामणी प्रतिनिधी -मनोज सावंत
धामणी :स्वच्छ धामणी सुंदर धामणी ही मोहीम आदर्श असून ती फक्त गाव व तालुक्यापुरती राहणार नाही तर महाराष्ट्राला दिशा देणारी ठरू शकते, जेव्हा ध्येयाने प्रेरित होऊन लोक एकत्र येतात त्यावेळी क्रांती घडत असते. अशीच स्वच्छतेबाबतची क्रांती ग्रामपंचायत धामणी ता.पाटण येथे घडत आहे असे दिसत आहे.
स्वच्छ धामणी सुंदर धामणी अभियानात सुरू असलेल्या श्रमदानातून स्वच्छतेच्या कामात सरपंच सौ.आशाताई नेर्लेकर ,उपसरपंच श्री. रमेश सवादेकर यांच्यासह ग्रामसेवक आर. एम .भोईर ग्रामपंचायत सदस्य,आणि ग्रामस्थ सहभागी होत परिसरातील स्वच्छता केली
धामणी येथे सुरू असलेल्या श्रमदानातून स्वच्छ धामणी अभियानात धामणी ग्रामवासी प्रत्येक मंगळवारी श्रमदान करून स्वच्छता करत आहेत.ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी गावातील मुख्य रस्त्यांवरील कचरा संकलित करून रस्ते स्वच्छ केले जातात . गावात राबविण्यात आलेल्या या विशेष स्वच्छता मोहिमेमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या अभियानात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य,सर्व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ व तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होत गाव परिसर स्वच्छ करतात.
************************************************
गाव स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक ग्रामस्थांची जबाबदारी आहे. त्यामुळे गाव प्रदूषणमुक्त राहील तरच ग्रामस्थ निरोगी राहतील.- रमेश सवादेकर उपसरपंच धामणी
आपल्या परिसरातील अस्वच्छतेचा परिणाम शेवटी आपल्याच जीवनावर होत असतो परिणामी आपण आजारी होतो व आपणस दवाखान्यात जावे लागते.त्यामुळे आपण आपल्याबरोबर आपल्या गावचे आरोग्य चांगले राहील याची काळजी घेऊया - सौ.शीतल संदीप पाटील (ग्रामपंचायत सदस्य धामणी)
----------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा