मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

कुंभारगाव : चाळकेवाडीतील महिलेचा अपघाती मृत्यू :परीसरात हळहळ


कुंभारगाव : चाळकेवाडीतील महिलेचा अपघाती मृत्यू :परीसरात हळहळ

कुंभारगाव ता.पाटण : दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी ( दि.12 डिसेंबर) कराड ढेबेवाडी रस्त्यावरील करपेवाडी फाट्याजवळ घडली.काजल विकास चाळके असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की चाळकेवाडी (कुंभारगाव) येथील काजल विकास चाळके सोमवारी दि.12 रोजी उपचारासाठी कराड येथे दवाखान्यात गेल्या होत्या तेथुन परत येताना करपेवाडी फाट्यावर त्यांचा दुचाकीचा अपघात झाला त्या दुचाकीवरून मागे पडल्या त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.त्यानां ताबडतोब उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले.दुर्दैवाने काल दि.13 रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.काल दुपारी चाळकेवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.काजल यांचे माहेर लोटळेवाडी -काळगाव असून त्यांचा सात वर्षांपूर्वी त्यांचा विवाह चाळकेवाडी येथील विकास चाळके यांच्याबरोबर झाला होता.त्यांना दोन मुले असून त्यांचे एक मूल केवळ दीड महिन्याचे आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान या अपघाताची ढेबेवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार करत आहेत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तळमावले परिसरात पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी; अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम.तेल पुरवठा सुरळीत ! अफवांवर विश्वास ठेवू नका पुरवठा विभागाचे आवाहन.

  📍 तळमावले, ता. पाटण | दि. २५ मार्च २०२६ तळमावले व परिसरात आज सकाळपासून पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी उसळल्याचे चि...