बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

चिखलेवाडी : जीवन ज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गटांना मार्गदर्शन

चिखलेवाडी : जीवन ज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गटांना मार्गदर्शन

कुंभारगाव | दि.14 : पाटण तालुक्यातील चिखलेवाडी  येथे ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गटांना मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात महिला सक्षमीकरण आणि स्व-विकास ते गाव विकास याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी महिलांनी शेती आणि घर संसार सांभाळताना बचत गट तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेवून शेतीपुरक छोटे मोठे उद्योग व्यवसाय करून आपली आर्थिक उन्नती साधुन आपले जीवनमान उंचवावे महिलांना शाश्वत उपजीविकेचे साधन तयार करून देणे व त्यातून रोजगार उपलब्ध करून देणे समुह गटाचे महत्व विशद करताना समुह गटांसाठी, वंचीत घटकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना, कर्ज योजना, सवलती या विषयी मौलिक मार्गदर्शन केले. महिलांनी छोटे मोठे व्यवसाय करून स्वयंरोजगार निर्माण केला पाहिजे त्यासाठी शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे सांगितले. हा या अभियानाचा उद्देश असल्याचे पाटण पंचायत समितीचे अधिकारी श्री अमित पाटील  यांनी सांगितले 

या कार्यक्रमासाठी परिसरातील महिला समुह गटाचे सभासद, सीआरपी सौ.निकहत मेहराज डिंगणकर ,सौ.सेजल संजय राणे (रत्नागिरी) सौ.अपर्णा गणवत गाडवे,सौ.मीनल सुधर्म काळे,(सातारा ) तसेच महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.याप्रसंगी व्यासपीठावर चिखलेवाडी गावचे ग्रामसेवक सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...