रविवार, १२ डिसेंबर, २०२१

कुठरे : पाटण तालुक्यातील विकासकामासाठी कधीही कमी पडणार नाही -गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई


कुठरे : पाटण तालुक्यातील विकासकामासाठी कधीही कमी पडणार नाही -गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई
 कुमजाई पर्व प्रतिनिधी-मनोज सावंत

विकासकामासाठी आपण कधीही कमी पडणार नाही पूर्वी लोक काम मागणीसाठी माझ्याकडे यायचे परंतु आता आमच्या कार्यालयातुन गावा-गावात कामा संदर्भात फोन जातो.विकास कामांमध्ये कसलेही राजकारण न करता जास्तीत जास्त विकास कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.
ते कुठरे येथील काळगाव रस्ता प्रजीमा 54 सुधारणा करण्याचे भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलत होते 
यावेळी व्यसपीटावर मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, प.स.सदस्य पंजाबराव देसाई,सौ.सीमा मोरे,बबनराव पाटील, अनिल शिंदे,सागर नलवडे,विशाल पवार,विलास गोडोंबे, आत्माराम पाचूपते,विजय शिंदे,व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. देसाई पुढे बोलताना म्हणाले की ग्रामीण भागातील लोकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला आहे.विकासाचा दृष्टीकोण ठेवूनच काम केले जाते दैनंदिन जीवनात उपयोगी असलेल्या विकासकामांना प्राधान्य दिले आहे.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी स्वाभिमानाने सोडलेले गृहराज्यमंत्री पद मला आपल्या व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून मिळाले आहे त्याचा उपयोग तालुक्यातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी केला जात आहे.
यावेळी डॉ.दिलीपराव चव्हाण,पंजाबराव देसाई ,आत्माराम पाचपुते यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास परिसरातील गांवांचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. सदस्य,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात डॉ.संदीप भिगरदेवें व अन्य वैद्यकीय अधिकाऱ्याचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
----------------------------------------------

मस्करवाडी न.2 चा शिवसेनेत प्रवेश
मस्करवाडी नं-2 मधील ग्रामस्थांनी बबन मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करण्यात आला.त्यांचे स्वागत व सत्कार गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...