कराड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सर्व सामान्यांचे आधारस्तंभ होते : कराड तालुका शिवसेनेच्या वतीने समृतीदिना निमित्त अभिवादन
कराड दि.17 शिवसेनाप्रमुख तथा हिंदुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ही एक व्यक्ती नसून एक अवतारी महापुरुष होते. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात मराठी माणूस टीकून राहिला इतकेच नव्हे तर देशातील सामान्य माणसाचा खराखुरा आधारस्तंभ केवळ बाळासाहेबच होते असे शिवसेनेचे मा.शहर प्रमुख व नगरसेवक प्रमोद वेर्णेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने कराड येथील यशवंत डी एम एलटी काँलेजमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होतेमा.बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या समृतीदिना निमित्त शिवसेना कराड तालुक्याच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार यावे हे बाळासाहेबांचे स्वप्न शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांनी पुर्ण केले आहे. तसेच आम्ही सर्व शिवसैनिक महाराष्ट्रातील जनतेपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवत आहोत.हिच बाळासाहेबांना सर्व शिवसैनिकांकडून खरी श्रध्दांजली वाहत आहोत.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक, उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, शंकर वीर, संजय चव्हाण, सुर्यकांत पाटील,सातारा जिल्हा दक्षता समिती सदस्य राजेंद्र माने, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब बनसोडे, विभाग प्रमुख प्रविण लोहार,निलेश पारखे, दत्तात्रय गायकवाड, महेश निकम, सुनिल पवार, रामभाऊ पवार, यश माने, उल्केश गायकवाड, भिमराव पाटोळे, बापू भिसे, दशरथ धोत्रे, जयंत जगताप आदी शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा