बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ८ कोटी ५० लाख निधी वितरित करण्यास मान्यता – महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर


माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ८ कोटी ५० लाख निधी वितरित करण्यास मान्यता – महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर

मुंबई, दि. 17- माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 8 कोटी 50 लाख निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना लागू करण्यात आली आहे.

या संबंधीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...