सातारा : जिल्ह्यातील दुर्गम भागात सेवा देणाऱ्या शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी चर्चा करणे व पुढील दिशा ठरविण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची सभा सोमवार दि.15 रोजी शिक्षक भवन ,सातारा येथे सभा घेण्यात आली.
या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या सुधारित जिल्हाअंतर्गत बदली धोरणाप्रमाणे दुर्गम भागात सेवा बजावणाऱ्या शिक्षकांची जिल्हाअंतर्गत संगणकीय बदली प्रक्रिया नियमित राबवावी.
जिल्ह्यातील दुर्गम भागात चार वर्षापासून अनेक शिक्षक सेवा बजावत आहेत. तीन वर्षानंतर इतर ठिकाणी बदलीचे नियम असताना दोन वर्षांपासून रखडलेली बदली प्रक्रिया सुधारित शासन निर्णयानुसार करण्यात यावी.
सातारा जिल्ह्यात दुर्गम भागात सेवा बजावणाऱ्या शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी दुर्गम क्रांती संघटनेची जिल्हा कार्यकारिणीची स्थापना करण्यात यावी इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली या चर्चेत जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनि सहभाग घेतला. यावेळी महाबळेश्वर, जावळी,पाटण,सातारा या दुर्गम तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक सभेला उपस्थित होते.
👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻🎉💐💐
उत्तर द्याहटवा