सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

तळमावळे : मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शेती सहकारी क्रेडिट संस्था मर्या;तळमावले ; शाखा-आगाशिवनगरच्या वतीने वाहन वितरण सोहळा संपन्न

तळमावळे : मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शेती सहकारी क्रेडिट संस्था मर्या;तळमावले ; शाखा-आगाशिवनगरच्या वतीने वाहन वितरण सोहळा संपन्न
तळमावले: मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती पतसंस्था तळमावले शाखा-आगाशिवनगर यांच्या वतीने  आज आगाशिवनगर  येथे संस्थेचे चेअरमन मा.श्री.अनिल शिंदे(साहेब)यांच्या हस्ते मा.श्री.अलताब पठाण यांना TATA SAFARI या गाडीचे वितरण करण्यात आले. 
यावेळी संस्थेचे चेअरमन श्री.अनिल शिंदे साहेब मा.राजेंद्र पवार(साहेब),मा.तात्यासाहेब डूबल(माजी सरपंच शिद्रुकवाडी),निलेश महापूर,सागर कदम,संस्थेचे व्यवस्थापक दिलीप गुंजाळकर,प्रदीप जानुगडे व सेवक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते
मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती पतसंस्था शेतकरी व समाजातील तळागाळातील लोकांच्यासाठी  विश्वासास पात्र ठरली आहे. संस्थेचे चेअरमन  श्री अनिल शिंदे साहेब  यांच्या नेतृत्वाखालील  मार्गदर्शनाखाली संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...