*कुठरे येथील डॉ. संदीप भिंगारदेवे सहित साताऱ्या मधील अपशिंगे (मिलिटरी ) आणि कामेरी या गावातील 10 तरुणांनाकडून वजीर सुळका सर.*
*महाराष्ट्रातील गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला २६० फूट उंच आणि ९०अंश कोनात असलेला "वजीर" सुळका शौर्य भुमी ट्रेकर्स अपशिंगे मिलिटरी आणि टीम पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचरच्या गिर्यारोहक संघाने सर केला आहे.
सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा 280 फुट वजीर सुळका शौर्य भुमी ट्रेकर्स अपशिंगे मिलिटरी आणि टीम पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचरच्या साहसी गिऱ्यारोहकांनी सर करत देशाचे भविष्य असणाऱ्या बालकांना सलाम करीत अभिमानाने तिरंगा फडकावत केलेली ही साहसी मोहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते तेनसिंग नॉर्गे साहस पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या सातारा कन्या प्रियांका मोहिते यांना समर्पित केली
या मोहिमेची सुरुवात सातारा ते कल्याण मार्गे नंदीकेश्वर मंदिर, वांद्रे गाव जि. ठाणे येथून झाली. घनदाट जंगलातील खड्या चढाई चा मार्ग वजीर सुळक्याच्या पायथ्याशी घेऊन जातो. आरोहण साठी सुमारे एक तास लागतो पहिला सोप्पा टप्पा पार केल्यावर क्रॅक (तडा गेलेला भाग ) गिऱ्यारोहकांची परीक्षा घेतो येथून क्रॅक डाव्या बाजूला ठेवुन उजव्या बाजूला जात पुढील टप्पा पार करावा लागतो. शेवटचा 25 फुटी निसरडा खडकाळ मार्ग शिखरावर घेऊन जातो.
*90 अंशातील सरळसोट कठीण चढाई, ओव्हरहँग चा खडतर मार्ग, निसरड्या पाऊल वाटेच्या शेजारी असणारी खोल दरी, पाण्याची कमतरता असलेला दुर्गम परिसर, घनदाट जंगल अशा सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेकर ऍडव्हेंचर च्या चेतन शिंदे आणि जॉकी साळुंखे यांच्या मार्गदर्शन खाली डॉ. संदीप भिंगारदेवे, संतोष निकम, अनुजा निकम, अक्षय पोळ, नवनाथ घाडगे, राहुल घाडगे, अजय गडांकुश, सचिन लोखंडे, आरोही लोखंडे, भरत घाडगे यांनी वजीर सुळका सर केला*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा