*सातारा जिल्ह्यातील 112 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 5 बाधितांचा मृत्यू*
*22 जणांना दिला आज डिस्चार्ज*
सातारा दि.10 ; जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 112 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 5 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 1, कराड 12, खंडाळा 1, खटाव 13, कोरेगांव 9, माण 8, महाबळेश्वर 0, पाटण 4, फलटण 31, सातारा 26, वाई 1 व इतर 6, असे आज अखेर एकूण 250093 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच सातारा जिल्ह्यात 5 जणांचा कोरोना उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 22 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमूने – 2147029
एकूण बाधित – 250093
घरी सोडण्यात आलेले – 241018
मृत्यू –6352
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा