महाराष्ट्र नगर मानखुर्द मधून पूरग्रस्तांना मदत
प्रतिनिधी / विजय साबळे
पाटण : मुंबईतील मानखुर्द महाराष्ट्र नगर येथील सर्वपक्षीय पदाधिकारी,समाजसेवकांनी आणि रहिवाशांनी एकत्र येऊन निधी जमा करून तर काहींनी जिवनाआवश्यक वस्तू जमा करत पाटण येथील आंबेघर वरचे, आंबेघर खालचे शिद्रुकवाडी ,कळकेवाडी,चव्हाणवाडी, किल्ले मोरगिरी, गुंजाळी-झाकडे, डोकावळे-पुनवली ,मीरगाव (कांबरगाव),गोकुळ नाला (कोयनानगर), बाजे (वरसरकुन), मळे, कोळणे ,पाथरपुंज,चिपळुण, खेर्डी, बहादूर नाका, या ठिकाणी जाऊन पूरग्रस्तांना स्वतः जाऊन मदतीचा हात दिला आहे.
यावेळी महाराष्ट्र नगर मधील रहिवाशांनी सांगितले की, आम्ही प्रसार माध्यमातून ही पूरपरिस्थिती पाहत होतो. अक्षरशः डोळ्यातून अश्रू अनावर झाले हाेते. चिपळूण,पाटणवर जी परिस्थिती ओढवली ती अजून कुठे उद्भवू नये. त्यामुळे खारीचा वाटा म्हणून आमच्या विभागातील सर्व रहिवाशांच्या माध्यमातून अत्यावश्यक वस्तूची मदत करत आहोत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा