मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

कुंभारगाव : वरेकरवाडीचा पाझर तलाव धोकादायक अवस्थेत

कुंभारगाव : वरेकरवाडीचा पाझर तलाव धोकादायक अवस्थेत 
तळमावले / मनोज सावंत
पाटण तालुक्यातील वरेकरवाडी परिसरातील तलावाच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. त्यामुळे याकडे लवकर लक्ष न दिल्यास तलाव फुटण्याची भीती स्थानिक ग्रामसंस्थांतून व्यक्त केली जात आहे. तलाव फुटून नुकसान होण्यापूर्वी संबंधित विभागाने आवश्यक पावले उचलून संभाव्य नुकसान टाळावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.पाठबंधारे विभागाचे अधिकारी सदर तलावाची पाहणी करून गेले आहेत त्यावर लवकर कारवाई करावी अशी अपेक्षा विक्रम वरेकर यांनी "कुमजाई पर्व" शी बोलताना व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील कुंभारगाव परिसरात चिखलेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत   डोंगरावर वरेकरवाडी हे गाव वसले आहे. या गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर पाझर तलाव आहे. या तलावाचे बांधकाम १५ वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. या तलावाच्या खालच्या बाजूला झरा व पाण्याचे चेंबर तसेच काही अंतरावरच सार्वजनिक विहीर देखील आहे. या तलाव शेजारून नेहमी ग्रामस्थांची ये-जा होत असते. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तलाव, विहिरी या तुडूंब भरून वाहू लागल्या आहेत. तर या अतिवृष्टीचा फटका काही तलाव, पाणी पुरवठा योजनांना बसला आहे. या तलावाच्या भिंतीचा भाग खचून त्याला मोठ्या भेगा पडल्याने तलाव फुटण्याची भीती आहे. तलाव फुटल्यास त्यातून बाहेर येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे शेतीसह विहीर, चेंबर व पाइपलाइनचेही नुकसान होऊ शकते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

थकीत कर्ज न भरणाकेल्याने दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल.

कर्ज न भरणार्‍यास दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल. पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज मुदतीत...