रविवार, ९ मे, २०२१

मराठा आरक्षण आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजेकेंद्र सरकार राज्य सरकार विरोधी पक्ष यांनी एकत्र बसून या मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात लवकरात लवकर मार्ग काढावा अन्यथा मराठा समाज्याचा उद्रेक झाला तर त्याला सर्वस्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते जबाबदार असतील

मराठा आरक्षण आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे

केंद्र सरकार राज्य सरकार विरोधी पक्ष यांनी एकत्र बसून या मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात लवकरात लवकर मार्ग काढावा अन्यथा मराठा समाज्याचा उद्रेक झाला तर त्याला सर्वस्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते जबाबदार असतील 
भारतीय मराठा संघाच्या वतीने राज्यातील राजकारण्यांना आरक्षणाच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे यामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली आहे
सकल मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात शांततेत एकूण 58 मोर्चे काढले यामध्ये प्रामुख्याने जी आरक्षणाची मागणी होती ती शांतपणे केंद्र सरकार व राज्य सरकार याच्यासमोर मांडताना कुठेही भावनांचा उद्रेक होऊ दिला नाही आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी काही बांधवांनी प्राणांची आहुती दिली तरीही सरकारचे डोळे उघडले नाहीत असे असताना आमच्या मागण्यांसाठी न्यायालयाच्या पायऱ्या झिजवल्या त्यानंतर पदरात काय पडले तर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण देता येत नाही असा निकाल 5 मे रोजच्या सुनावणीत दिला आणि आरक्षण रद्द करण्यात आले.हा दुर्दैवी दिवस मराठा समाज कधी विसरणार नाही मराठा आरक्षणाचे राजकारण करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांचा भारतीय मराठा संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे
सुप्रीम कोर्टात आरक्षण रद्द झाल्याबरोबर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर टीका करत आम्ही कसे मराठा समाजाबरोबर आहे असा खोटा आव आणत आहेत आरक्षण रद्द झालेल्या घटनेला सर्वच राजकीय पक्ष आणि नेते मंडळी जबाबदार आहेत 
केंद्र सरकार राज्य सरकार विरोधी पक्ष यांनी एकत्र बसून या मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात लवकरात लवकर मार्ग काढावा अन्यथा मराठा समाज्याचा उद्रेक झाला तर त्याला सर्वस्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते जबाबदार असतील असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते,राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तळमावले परिसरात पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी; अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम.तेल पुरवठा सुरळीत ! अफवांवर विश्वास ठेवू नका पुरवठा विभागाचे आवाहन.

  📍 तळमावले, ता. पाटण | दि. २५ मार्च २०२६ तळमावले व परिसरात आज सकाळपासून पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी उसळल्याचे चि...