तळमावले/वार्ताहर
काळगाव ता.पाटण : कुटूंबात नवीन पाहुणा किंवा बाळ येणार असेल तर आपला आनंद गगनात मावत नाही. सातव्या महिन्यात डोहाळे जेवण घातले जाते. यात लेक किंवा सुनेचे लाड पुरवले जातात. बाळ होणाÚया मातेचे औक्षण करुन डोहाळे जेवण करुन कार्यक्रम साजरा केला जातो. अशाच प्रकारचे डोहाळेजेवण पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील गायीचे घालण्यात आले. या गायीला प्रेमाने सर्वजण ‘कपिला’ म्हणतात. यावेळी पुरणपोळीचा छानसा बेतही केला होता.
कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर गर्दी न करता हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. गायीला वासरु होणार या निमित्ताने गायीचे डोहाळेजेवण करण्यात आले. आपल्या घरातील पशुंबद्दल प्रेम व्यक्त करत डाकवे कुटूंबाने समाजाला आगळा वेगळा संदेश दिला. त्यामुळे डाकवे कुटूंबाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
गायींमुळे घरी लक्ष्मी वास करते. अशी श्रध्दा असल्यामुळे या गायीचे डोहाळेजेवण करण्याचा निर्णय डाकवे कुटूंबियांनी घेतला. प्रथम सुहासिनंीनी ओवाळणी करुन गायीची ओटी भरली. नवी साडी चोळी भरुन दिली. याप्रसंगी सौ.गौरी डाकवे, सौ.गयाबाई डाकवे, सौ.निता डाकवे, सौ.लक्ष्मी डाकवे, सौ.जिजाबाई मुटल, सौ.सुलाबाई डाकवे व इतर महिला उपस्थित होत्या. त्यानंतर महिलांनी पाळणा गीत म्हटले.
देशी गायींचे प्रमाण कमी होत चालले असताना डाकवे यांनी 2 वर्षापूर्वी ही गाय आणली होती. तिला घरचे सदस्य मानून संगोपन केले.
अलिकडच्या काही वर्षात गाईचे महत्व पटू लागल्यामुळे शेतकÚयांकडून देशी गायींचे संगोपण करण्यावर भर दिला जावू लागला आहे. डाकेवाडी येथील भरत डाकवे हे मुळचे वडाप व्यावसायिक. गाडीला जोडव्यवसाय म्हणून त्यांनी बैल, म्हैस व गायीचे संगोपण केले आहे. सध्या कोरोनामुळे गाडीचा व्यवसाय पूर्ण बंद आहे. या काळात थोडासा बदल म्हणून डोहाळेजवण करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
शेतकरी गायीला मातेसामन मानतात. गायीचे दूध गुणकारी असल्याने या कुटूंबाने गाय पाळण्याचे स्पष्ट केले. लाडक्या कपिला गायाीच्या डोहाळे जेवण कार्यक्रमानिमित्त भरत डाकवे व संपूर्ण कुटूंबियांनी गायीला फुलांच्या माळांनी सजवलेले होते. शिंगात रिबीनी घातल्या होत्या.
गायीसाठी कळ्याचे लाडू, पेढे, केळीची फणी, पुरणपोळी जेवण केेले होते. या कार्यक्रमाचे कौतुक उपस्थित नागरिक करत होते. या ‘हटके’ कार्यक्रमाची चर्चा गावात व सोशल मिडीयावर चांगलीच रांगली होती.
या कार्यक्रमाचे संयोजन राजाराम डाकवे, भरत डाकवे, सौ.गौरी डाकवे, डाॅ.संदीप डाकवे, सौ.रेश्मा डाकवे, पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे, चि.स्पंदन डाकवे व अन्य यांनी केले.
चैकट:
गोमातेचे संरक्षण व्हावे असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. समाजात ज्याप्रमाणे मानवाला संरक्षण दिले जाते त्याप्रमाणे गोमातेचे देखील सरंक्षण व्हावे हा यामागील उद्देश आहे. समाजात गायीवरील श्रध्दा, गायीचे आपल्या जीवनातील स्थान त्यापासून मिळणारे फायदे हे आरोग्यासाठी उपयुक्त आहेत, असे भरत राजाराम डाकवे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा