*तळमावले : प्रा. सुरेश यादव यांना 'राज्यस्तरीय "प्राईड ऑफ स्पंदन" पुरस्कार जाहीर*
तळमावले: स्पंदन चारिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा 'राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड, 2021' पुरस्कार कुंभारगाव येथील प्रा. सुरेश यादव यांना जाहीर झाला आहे. ते सध्या शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे कार्यरत आहेत
स्पंदन चारिटेबल ट्रस्टचे संस्थापक/ अध्यक्ष डॉ.संदीप डाकवे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्काराने संस्था विविध क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करते. प्रा. यादव यांनी खडतर परिस्थितीवर मात करून शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात प्रभावीपणे कार्य केलेले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रा. यादव यांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती संस्थापक/अध्यक्ष डॉ. संदीप डाकवे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा