गुरुवार, १३ मे, २०२१

मुंबई :राज्यातील लॉकडाऊन जूनपर्यंत वाढवला

मुंबई : लॉकडाऊन जूनपर्यंत वाढवला 

मुंबई : राज्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने 'ब्रेक दि चेन' अंतर्गत सुरू असलेले कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे निर्बंध आता १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. याबाबत राज्य शासनाकडून परिपत्रक काढून माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील लॉकडाऊन वाढवल्याने त्याचा रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात फायदा होत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे राज्य शासनाने १जून पर्यंत लॉकडाऊन वाढवल्याचे समजते. सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढलेली रुग्ण संख्या आता नियंत्रणात येऊ लागली आहे.

लॉकडाऊनमुळे हे शक्य झाले असल्याचे बुधवारी, ११ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील मंत्र्यांचा सूर होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जूनपर्यंत वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत राज्य शासनाने एक परिपत्रक काढून त्याबाबतची नियमावली जाहीर केली आहे.

परराज्यातून महाराष्ट्रात येणा-यांना ४८ तासांच्या आधीचा RTPCR रिपोर्ट सोबत ठेवणे बंधनकारक.

महाराष्ट्राने घोषित केलेल्या संवेदनशील राज्यांतून येणा-या प्रवाशांना RTPCR रिपोर्ट सोबत ठेवणे बंधनकारक.

परराज्यातून मालवाहूतक करणा-यांचा RTPCR रिपोर्ट निगेटिव्ह असावा. हा रिपोर्ट ७ दिवस ग्राह्य धरला जाईल.

मालवाहतूक ट्रक मध्ये केवळ एक ड्रायव्हर आणि एका क्लिनरलाचं परवानगी असेल.

बाजारपेठांमध्ये गर्दी वाढल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाने त्या बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घ्यावा.

दूधाच कलेक्शन, वाहतूक आणि प्रकिया यांना परवानगी असणार.

एअरपोर्ट आणि बंदरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल मेट्रो आणि मेट्रो मध्ये प्रवासाची परवनागी असेल.

राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून 2021 रोजी सकाळी सात वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अजून काही निर्बंध लावण्यात आले आहेत. 'ब्रेक दि चेन' अंतर्गत यासंदर्भातील शासन आदेश आज निर्गमीत करण्यात आला आहे.

२९ एप्रिल रोजी कोरोना विषाणूच्या प्रसारावर अंकुश लावण्यासाठी हे निर्बंध दि.१५ मे पर्यंत लागू करण्यात आले होते, तसेच नवीन मार्गदर्शक तत्वेही जाहीर करण्यात आली होती. आता हे निर्बंध १ जून रोजी सकाळी सात वाजेपर्यंत कायम असतील.

साथरोग अधिनियम-१८९७, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदी अनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. 'ब्रेक दि चेन' संबंधी १३ एप्रिल २०२१, २१ एप्रिल २०२१ व तद्‌नंतर २९ एप्रिल २०२१ रोजी घोषित केलेले सर्व निर्बंध १ जून २०२१ पर्यंत लागू राहतील. त्याव्यतिरिक्त पुढील निर्बंधही लागू करण्यात आले आहेत.

किराणा दुकाने- सकाळी 7 ते 11

दुध संकलन आणि वितरणाला परवानगी

एअरपोर्ट आणि बंदरावर काम करणाऱ्याना लोकलने प्रवास करण्याची परवानगी

इतर राज्यातून येणाऱ्यांना 48 तास आधीचा RTPCR रिपोर्ट बंधनकारक

बाजारपेठामध्ये गर्दी वाढल्यास स्थानिक प्रशासनाकडे निर्णय घेणार

दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी 7 ते 11

भाजीपाला विक्री- सकाळी 7 ते 11

कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने- सकाळी 7 ते 11

पशुखाद्य विक्री- सकाळी 7 ते 11

बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने -सकाळी 7 ते 11

पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने- सकाळी 7 ते 11

फळे विक्री- सकाळी 7 ते 11

अंडी,मटण, चिकन,मासे विक्री- सकाळी 7 ते 11

येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने-सकाळी 7 ते 11


१.कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त ४८ तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.

२. यापूर्वी १८ एप्रिल आणि १ मे २०२१ रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.

३. मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त ४८ तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.

४. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर 'डीएमए'ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.

५. दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक असणा वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते 'होम डिलिव्हरी' करू शकतील.

६. कोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.

७.स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एसडीएमए) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास पूर्वी त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...