शनिवार, १५ मे, २०२१

कुंभारगाव : शेंडेवाडी पाझर तलावातील मासे दूषित पाण्यामुळे मृत्युमुखी :पाण्याचे नुमने तपासणीसाठी प्रयोगशाळेत

कुंभारगाव : शेंडेवाडी पाझर तलावातील मासे दूषित पाण्यामुळे मृत्युमुखी :पाण्याचे नुमने तपासणीसाठी पाठवले

 तळमावले : शेंडेवाडी (कुंभारगाव, ता. पाटण) गावाजवळच्या पाझर तलावातील मासे अचानक मृत्युमुखी पडू लागल्याने ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत. या तलावाजवळ खालच्या बाजूला असलेल्या  गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरी असून तलावातील दूषित पाणी पाझरण्याची भिती असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तलावातील आणि विहरीमधील पाण्याचे नमुने तातडीने रासायनिक तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश  गोंजारी यांनी साप्ताहिक "कुमजाई पर्व".शी बोलताना सांगितले.

शेंडेवाडी पासून एक किलोमीटरच्या अंतरावर डोंगर पायथ्याशी जुना पाझर तलाव असून त्यात मुबलक पाणीसाठा असतो.गेल्या दोन दिवसांपासून त्यातील मासे अचानक मृत्युमुखी पडून पाण्यावर तरंगत असल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनास आली. याबाबत समजताच चिखलेवाडी येथिल ग्रामविकास अधिकारी प्रसाद यादव तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,आरोग्य कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. एक ते दीड किलोपर्यंत वजनाचे लहान-मोठे मृत मासे काठावर तरंगत असल्याचे आढळून आले.तलावापासून जवळच शेंडेवाडी,चिखलेवाडी, गलमेवाडी, या ग्रामपंचायतिच्या हद्दीतील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नळयोजनेच्या विहीरी आहे. तलावातील पाणी झिरपून विहिरीत मिसळण्याची भीती असल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे. मासे नेमके कोणत्या कारणांनी मृत्युमुखी पडत आहेत. मासेमारीच्या उद्देशाने तलावातील पाण्यात कोणता विषारी घटक तर मिसळलेला नाही ना? याची तातडीने तपासणी होणे गरजेचे असल्याने आज शनिवारी तेथील पाण्याचे नमुने रासायनिक तपासणीसाठी कराड येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच माशांच्या मृत्यूचे नेमके कारण समजेल.

दरम्यान संबंधित विहरीमधील पाणी शुद्धीकरण करण्यात आले असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आहवान आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे

हा तलाव डोंगरपायथ्याशी असल्याने रात्री अनेक जगली प्राणी पाणी पिण्यासाठी या तलावात येत असतात त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.जर मासेमारीच्या उद्देशाने हा प्रकार घडला असेल तर संबंधित व्यक्तीला शोधून त्यावर कडक कारवाई करण्यात यावी.

-विक्रम वरेकर (माजी सैनिक वरेकरवाडी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...