संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
गुरुवार, २० मे, २०२१
*सातारा येथे स्थापित होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या साधनसामुग्रीसाठी
शासनाकडून निधी मंजूर* - *पालकमंत्री बाळासाहेब पाटील*
सातारा दि. 20:सातारा येथे नव्याने स्थापित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम
वर्षाकरिता संगणक व इतर खरेदी करण्यास आणि आयुर्विज्ञान आयोगाकडून होणाऱ्या
निरिक्षणाकरिता यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदी करण्यास राज्य योजनेंतर्गत निधी
उपलब्धतेसह प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब
पाटील यांनी दिली आहे. सातारा येथे नव्याने स्थापित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात
प्रथम वर्षाकरिता संगणक व इतर खरेदीसासाठी 38 लाख 10 हजार इतक्या रक्कमेस 18 मे
2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच
महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता कोणतीही यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने राष्ट्रीय
आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांच्या निरिक्षणाकरीता त्यांच्या मानकानुसार
शरीररचनाशास्त्र, शरिरक्रियाशास्त्र व जीवरसायनशास्त्र या विभागांकरिता आवश्यक
असलेली यंत्रसामुग्री व साधनसामुग्रीसाठी सातारा, सिंधुदुर्ग व अलिबाग येथील
नव्याने स्थापित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना 8 कोटी 95 लाख 61 हजार 394 इतक्या
रक्कमेस 18 मे च्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे, असेही
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*
मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा