अवकाळी पावसात नुकसानग्रस्तांची गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केली पाहणी.फोटो :अनिल देसाई (कुंभारगाव)
तळमावले /मनोज सावंत
पाटण तालुक्यात बहुतांशी भागात 15 मे रोजी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाने असंख्य घराचे नुकसान केल्याने नुकसानग्रस्त नागरीक हवालदील झाल्याचे चित्र ढेबेवाडी विभागात पाहायला मिळत आहे. आशा वेळी पाटण तालुक्याचे मा.ना.शंभूराज देसाई यांनी वादळाने नुकसान झालेल्या वाड्यावस्त्यातील प्रत्येक नुकसानग्रस्तापर्यंत पोचून दोन दिवसांत पंचनामे सादर करा. त्यामध्ये अजिबात दिरंगाई करू नका, अशा स्पष्ट सूचना गृहराज्यमंत्री देसाई यांनी आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.विभागात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मंत्री देसाई यांनी आज पाहणी केली. त्यानंतर येथील पोलिस ठाण्यात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोंपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्यासह महसूल, वीज, पाणीपुरवठा, कृषी आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.वादळी पावसामुळे ढेबेवाडी विभागातील निगडे, शिबेवाडी (गुढे), अंबवडे खुर्द, चाळकेवाडी, मंद्रुळकोळे आदी ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.यातील काही ठिकाणी मंत्री देसाई यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. विभागातील एकूण नुकसानीचा बैठकीत आढावा घेतला. ते म्हणाले, "पावसाळा तोंडावर आहे. उद्ध्वस्त निवारे तातडीने पुन्हा उभे राहण्याच्या दृष्टीने नियोजन करा. कुणीही नुकसानग्रस्त पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये. वाड्यावस्त्यांवर पोचून माहिती घेऊन दोन दिवसांत पंचनाम्यांचे काम संपवा. वादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करा.'' आशा सूचना मंत्री देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा