तळमावले/वार्ताहर
तळमावले विभागात गेले दोन दिवसापासून ढगाळ वातावरण होते . काल संध्याकाळी 6 नंतर जोरदार वाऱ्यासह पाऊस आल्याने लोकांची चांगलीच धांदल उडवली. या पाऊस व वाऱ्यामुळे गुढे येथील शिबेवाडी (वरची) गावचे रहिवाशी श्रीमती शांताबाई निवृत्ती शिबे घराची भिंत शनिवार दि.15 मे, 2021 रोजी सायंकाळी 6 च्या आसपास खाली कोसळली आहे. या घरामध्ये शांताबाई शिबे आणि त्यांचा नातू हे दोघे राहतात. सुदैवाने या भिंतीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सदर भिंत पडल्यामुळे या कुटूंबाचे बरेच नुकसान झाले आहे.त्यांना भरपाई मिळावी अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा