सातारा : जिल्हयातील कंत्राटी 27 बीएएमएस डाॅक्टरांची सेवा खंडित
तळमावले/वार्ताहर
सातारा जिल्ह्याातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातील बीएएमएस कंत्राटी वैद्यकीय अधिकाÚयांची सेवा खंडित केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे जिल्हयातील 27 डाॅक्टरांना सेवेतून बाहेर राहावे लागणार आहे. त्यांच्या जागेवर बंधपत्रित एमबीबीएस डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात येत आहे. हा अन्याय आहे. असे वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडू, असेही त्यांनी म्हटले आहे.
ज्या काळात कोरोनाचा हाहाकार माजला, त्या काळात दोन वर्षे या वैद्यकीय अधिकाÚयांनी सेवा बजावली. त्यांच्या कामाचा शासनाला विसर पडला आहे. सेवेतून कमी करुन शासनाने आमच्यावर अन्याय केला आहे, असे मत डाॅक्टरांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील 845 डाॅक्टरांनी कोरोनाकाळात सेवा केली. जिवाची पर्वा न करता चोख कामगिरी बजावली; पण आाता बीएएमएस डाॅक्टरांना सेवा मुक्त करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने लेखी पत्राव्दारे कळवले आहे. आजपर्यंत केलेल्या कंत्राटी सेवेचा शासनाला विसर पडला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाÚयांसोबत तिसरा बीएएमएस वैद्यकीय अधिकाÚयाची जागा निर्माण करावी, अशी मागणी डाॅक्टरांकडून करण्यात येत आहे. दोन वर्षे या डाॅक्टरांना अधिकारी केले, आता शासनाने सेवा समाप्त केली असेल तर त्यांनी करायचे काय? हा सवाल उपस्थित होत आहे.
आरोग्य केंद्रात काम मिळाल्यामुळे डाॅक्टरांनी खासगी दवाखाना सुरु केला नाही. या स्थितीत ते कुठे नोकरी, दवाखाना सुरु करु शकत नाही. अशी त्यांची स्थिती झाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हयाचे पालकमंत्री तसेच संबंधित यंत्रणा यांच्याकडे वारंवार प्रश्न उपस्थित करुनही अन्याय होत असेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशारा डाॅक्टरांनी दिला आहे.
कोरोना महामारीच्या काळात बीएएमएस डाॅक्टरांनी चांगली सेवा बजावली आहे. आमची सेवा खंडित करणे आमच्यावर अन्याय आहे. आरोग्य विभागाने याचा फेर विचार करावा.- डाॅ.मगेश खबाले
फोटो : जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे अन्यायकारक सेवामुक्त आदेश रद्द करण्यासाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी सातारा जिल्हा यांचे वतीने निवेदन देताना डाॅ.मंगेश खबाले, उपाध्यक्ष निमा कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (गट अ) राज्यस्तरीय संघटना
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा