रविवार, ९ मे, २०२१

*उद्या दि.10मे पासून सातारा जिल्ह्यातील 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण होणार सुरुवात*

*उद्या दि.10मे पासून सातारा जिल्ह्यातील 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण  होणार सुरुवात*

सातारा दि. 9: 10 मे 2021 पासून सातारा जिल्ह्यातील  खालील ठिकाणी 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. सदर सत्रे ही फक्त 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठीच असून ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करुन अपॉइनमेन्ट घेणे बंधनकारक आहे. नोंदणीसाठी उद्या दि. 10 मे 2021 पासून रोजी सकाळी 11 www.cowin.gov.in किंवा https://selfregistration.cowin.gov.in या संकेत स्थळावर आपली अपॉइनमेन्ट निश्चित करता येईल. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. 
         सातारा जिल्ह्यातील  खालील प्रमाणे कोविड लसीकरण सत्राची ठिकाणे : कराड येथील उपजिल्हा रुग्णालय, कोरेगांव येथील ग्रामीण रुग्णालय,खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,पाटण येथील ग्रामीण रुग्णालय,फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय,महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय, माण येथील ग्रामीण रुग्णालय,दहिवडी. मेढा येथील ग्रामीण रुग्णालय,वाई येथील ग्रामीण रुग्णालय,खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,शिरवळ. व सातारा येथील जिल्हा रुग्णालय,सातारा.असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांनी कळविले आहे. 
                                            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...