शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये - जिल्हाधिकारी

संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये - जिल्हाधिकारी

सातारा  : शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा शासनाने घालून दिलेल्या वेळेनुसार सुरु राहणार असून उर्वरित नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही, असे आवाहन सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर शनिवार-रविवार बाहेर फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विनाकारण बाहरे पडल्यास पोलीस प्रशासनाच्या कारवाईस सामोरे जावे लागेल. अत्यावश्यक सेवेमधल्या बाबीसुध्दा शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार सुरु राहणार आहेत. तसेच 30 एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा जमावबंदी आदेश आठवड्याच्या 7 दिवसांसाठी लागू राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील उद्योगही 7 दिवस सुरु राहणार आहेत. शिफ्टमध्ये काम करतात अशा उद्योगातील कर्मचार्‍यांनी आपल्या कंपनीचे फोटो असलेले ओळखपत्र सोबत ठेवावे. त्यांना शनिवार व रविवारी कामावर जाण्यासाठी अडविणार नाही. रेस्टॉरंट व बारमध्ये सोमवार ते शुक्रवार पार्सल सेवा सुरु होती. मात्र, शनिवारी व रविवारी ही पार्सल सेवा घ्यायला नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. परंतू रेस्टॉरंट व बारमधून घरपोच सेवा देता येऊ शकते. ई-कॉमर्स, शेती संबंधित कामे यांना बंधने नाहीत. लग्न समारंभासाठी तहसीलदारांची परवानगी घ्यावी. 50 पेक्षा जास्त लोकांनी लग्न समारंभास उपस्थित राहू नये. याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ग्रामीण भागातील नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. ज्यांचा पोटापाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून सामाजिक संस्थांनी यासाठी मदत करावी. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून इतर दुकाने बंद आहेत. अशा दुकानदांरानी यापुर्वी जसे सहकार्य केले होते त्याचप्रमाणे यावेळी सहकार्य करावे, असे आवाहन शेखर सिंह यांनी केले आहे.

खासगी डॉक्टरांनी रेमडेसिवीरचा वापर प्रोटॉकॉलप्रमाणे करावा. रेमडेसिवीरचा औषध हे कोरोना संसर्ग रुग्णाच्या नातेवाईकांच्या दबावाखाली दिले जात आहे. तसे न करता डॉक्टरांनी प्रोटॉकॉलप्रमाणे रेमडेसिवीरचे औषध द्यावे. जिल्ह्याला रेडिमसनचा पुरवठा 100 टक्के होईल. रुग्णांना सहजरित्या उपलब्ध होईल, यासाठी पालकमंत्री व लोकप्रतिनिधींच्या माध्यतातून प्रयत्न करत आहोत. रेमडेसिवीरच्या औषधाबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी घाबरुन जावू नये. गरज असेल तर कोरोना संसर्ग रुग्णास डॉक्टर रेमडेसिवीर औषध देतील. रेमडेसिवीरच्या औषधासाठी लवकरच कक्ष स्थापन करुन या कक्षाच्या माध्यमातून वितरण करण्यात येणार असल्याचेही सिंह सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...