कुंभारगाव ता।पाटण :कुंभारगाव परिसरात सद्यस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येथील सोमवार( दि 12 एप्रिल ) होणारा आठवडी बाजार रद्द करण्याचा निर्णय कुंभारगाव ग्रामपंचायत प्रशासनाकडून कडून घेण्यात आला आहे.पुढील आदेश होईपर्यंत हा बाजार भरणार नाही याची व्यापारी वर्ग तसेच ग्राहक यांनी नोंद घ्यावी.असे आवाहन कुंभारगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निर्दशनास आल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदी नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही कुंभारगावच्या सरपंच सौ.सारिका पाटणकर यांनी दिला आहे.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करणेकामी जिल्हाधिकारी सातारा यांनी दिलेल्या आदेशानुसार कुंभारगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या सूचनांप्रमाणे कुंभारगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्र अंतर्गत सर्व व्यापारी, हॉटेल चालक, पिग्मीएजंट यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून स्वतःची कोरोना टेस्ट करून घ्यावी, ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांनी व व्यापारी लोकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन ग्रामपंचायत कुंभारगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा