*खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून क्रीडांगण व व्यायाम शाळेसाठी निधी मंजूर*
कराड : प्रतिनिधी
खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून क्रीडांगण विकास व व्यायाम शाळा विकास अनुदान योजनेतून चार गावांसाठी 17 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. तशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
कराड तालुक्यातील श्री आत्माराम विद्यालय ओगलेवाडी येथे विविध खेळांचे मैदाने तयार करण्याच्या कामासाठी 5 लाख रुपये, ग्रामपंचायत गोटे येथे व्यायाम शाळा साहित्यासाठी 3 लाख 50 हजार रुपये, पाटण तालुक्यातील मारुल हवेली येथे व्यायाम शाळा बांधण्यासाठी 3 लाख 50 हजार रुपये व सातारा तालुक्यातील नेले किडगाव येथील श्री भैरवनाथ विद्यालय येथे प्रसाधनगृह बांधण्याच्या कामासाठी 5 लाख 25 हजार रुपये मंजूर झाले आहेत. क्रीडांगण विकास व व्यायाम शाळा विकास अनुदान ( सर्वसाधारण ) योजना सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये ही कामे मंजूर झाल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी खा.श्रीनिवास पाटील यांना कळवली आहे. सातारा लोकसभा मतदार संघातील विविध विकासकामांसाठी खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून निधीचा ओघ सुरू असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा