रविवार, ११ एप्रिल, २०२१

खा.श्रीनिवास पाटील : हातात विळा घेऊन गव्हाची काढणी करणारे 81 वर्षाचे तरुण शेतकरी

खा.श्रीनिवास पाटील : हातात विळा घेऊन गव्हाची काढणी करणारे 81 वर्षाचे तरुण शेतकरी 
कराड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाकटडून अनेक निर्बंध घातले जात आहेत. तसेच वीकेंड लाॅकडाऊनमुळे घरातून बाहेर पडणे मुश्किल बनले आहे. अशावेळी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. अशावेळी सातारा जिल्ह्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे मात्र आपल्या शेतातील कामात व्यस्त आहेत.
 सप्ताहांताच्या दिवशीचा लॉकडाऊन असल्याने गोटे, कराड येथील संपर्क कार्यालय बंद होते त्यामुळे खासदार साहेबांनी हातात विळा घेऊन तयार झालेला खपली गव्हाची काढणी करून आपला हा वेळ सत्कारणी लावला. 
सातारा जिल्ह्यातील कराड येथे असलेल्या निवासस्थानाजवळील शेतातील गहू पिक काढण्यामध्ये खासदार श्रीनिवास पाटील हे व्यस्त असल्याचा व्हिडिअो सध्या व्हायरल होत आहे.
खासदार श्रीनिवास पाटील हे ८१ वर्षाचे असून ते नेहमीच आपल्या कार्यशैलीमुळे चर्चेत असतात. या वयातही ते शेतात करत असलेल्या कामामुळे अनेकांचा उत्साह वाढवणारा आहे.तसेच मध्यंतरी दोन अवकाळी पाऊस झाले त्यामुळे पिकाचे बरेच नुकसान झाले. आता हाताशी आलेल्या खपली गव्हाचे पुन्हा एखाद्या अचानक येणाऱ्या वळीव पावसात नुकसान होण्या आधी कापून घेण्यासाठी संधी मिळाली. 
शेतकरी शेतात अपार कष्ट करतो, पिकाला जीवापाड जपतो पण तरीही तो निसर्गाच्या कृपेवरच अवलंबून असतो. जोपर्यंत सर्व संकटातून पीक सुखरूप घरात पोहोचत नाही तोपर्यंत काहीच खरं नसतं. म्हणूनच पीकाचं सगळं वेळापत्रक सांभाळून पिकाची आणि जमिनीची देखील निगा घ्यावी लागते, तेंव्हाच ही  काळी आई शेतकऱ्यांना भरभरुन देते. 
गव्हाची कापणी करीत असताना काळ्या आईचे हे ॠण मनोमन स्मरण करीत नतमस्तक झालो. यावेळी स्वतः च्या शेतात काम करण्यात वेगळाच आनंद असल्याचे ते म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...