मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१

खा.श्रीनिवास पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तळमावले येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

खा.श्रीनिवास पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तळमावले येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
कुंभारगाव ता.पाटण ; सध्या संसर्गजन्य कोरोना महामारीचे भीषण संकट उभे ठाकले असल्यामुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताअभावी इतर रुग्णांना आपले जीव गमवावे लागत असल्यामुळे रक्तदानाद्वारे मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर शासनाकडून रक्तदानाचे आवाहन करण्यात येत आहे. 
याचं अनुषंगाने सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजिवन प्रतिष्ठान कुंभारगाव व नवभारत पतसंस्था तळमावले यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ फेब्रुवारी २०२१ गुरूवार रोजी सकाळी १० वा तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी स्व.वेणुताई चव्हाण रक्तपेढी व स्व.वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालय कराड यांचे सहकार्य असणार आहे.सध्याच्या परिस्थितीत सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता जाणवू लागली आहे.या परिस्थितीची जाणीव ठेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपत खासदार श्रीनिवास पाटील साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असे संजिवन प्रतिष्ठानचे सचिव प्रा सचिन पुजारी सरांनी अवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी 8888280748 या नंबरवर संपर्क साधावा।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तळमावले परिसरात पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी; अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम.तेल पुरवठा सुरळीत ! अफवांवर विश्वास ठेवू नका पुरवठा विभागाचे आवाहन.

  📍 तळमावले, ता. पाटण | दि. २५ मार्च २०२६ तळमावले व परिसरात आज सकाळपासून पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी उसळल्याचे चि...