रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

*"शाळा बंद शिक्षण चालू"* उपक्रमांतर्गत शिक्षिका छायाताई बैस यांचे प्रेरणादायी कार्य ...

*"शाळा बंद शिक्षण चालू"* उपक्रमांतर्गत शिक्षिका छायाताई बैस यांचे प्रेरणादायी कार्य ...

 कोरोना पाश्र्वभूमीवर बदलत्या शिक्षण पद्धतीच्या विचार करून विद्यार्थ्यांसह शाळेचा नावलौकिक वाढवा या साठी सातत्याने प्रयत्न करणारे शिक्षक हे समाजासाठी प्रेरणास्थान ठरत असतात.
  जिल्हा परिषद हायस्कूल लोहा येथील कार्यरत राज्य पुरस्कार प्राप्त विषय शिक्षिका श्रीमती छायाताई बैस चंदेल ह्या
 व्हाटसअप च्या माध्यमातून  दररोज न चुकता शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत  विद्यार्थ्यांना  शैक्षणिक व्हिडीयो निर्मिती, स्वाध्याय, रोजचा अभ्यास, वस्तूनिष्ट प्रश्न ईत्यादी प्रकारे अध्यापनाचे कार्य सुरु केले आहे.  

कोरोना संसर्गामुळे  सर्व व्यवहार ठप्प आहेत याचाच परिणाम  संबंध शा्लेय शिक्षण पद्धतीवर झाला आहे. विद्यार्थ्यांची शालेय अध्ययन व अध्यायपनातील रंजकता वाढ़ावी, मुलांना शाळेविषयी गोडी वाटावी यासाठी श्रीमती छायाताई बैस चंदेल यांनी जवळपास पन्नास पेक्षा अधिक  व्हिडीयो त्या विषयावर आधारीत तयार केलेले आहेत. मुलांची ऑनलाइन ऑफलाइन शंभर टक्के उपस्थिती निर्माण व्हावी, गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी त्यांनी वर्गानुसार व्हाटसअप ग्रुप तयार केले. व्हाटसअप द्वारे संपर्क साधता येणारे विद्यार्थी, एसएमएस द्वारे संपर्क साधता येणारे, मोबाइल नसणारे, टीव्ही, रेडियो उपलब्ध असणारे विद्यार्थी यांचे वेगवेगळे ग्रुप तयार करून त्यानुसार लॉकडाउनच्या कालावधीचा  सदुपयोग केला आहे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत.               

सध्या कोरोनाच्या काळात मुलांना प्रत्यक्ष शिक्षण देणे शक्य नाही यासाठी त्यांनी रोज सकाळी व्हाटसअप ग्रुप वर साध्या टेक्स्ट मेसेज द्वारे अभ्यास पाठवून तो अभ्यास व्हाटसअप वरच तपासला जातो यात त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मोलाचा वाटा आहे .यासोबत शाळा निसर्गरम्य ठेवण्या साठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंजुळा जाधव व राजीव तिडके यांनी शाळेत वृक्षारोपण, परसबाग तयार केली आहे.
रोपे जगविण्यासाठी सतत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...