गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

*सातारा ; 870 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 682 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

*सातारा ; 870 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 682 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
सातारा दि. 3 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर डिसीएच, डिसीएससी, व सीसीसी येथून आज संध्याकाळपर्यंत उपचार घेत असलेल्या 870  नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 682 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 
  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 11, उपजिल्हा रुग्णालय कराड 13, उपजिल्हा रुग्णालय फलटण 54, कोरेगाव 37, वाई 56, खंडाळा 57, रायगांव 76,  पानमळेवाडी 45, मायणी 27, महाबळेश्वर 50, दहिवडी 49,  खावली 41,  व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 166 असे एकूण 682 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने --   47347
एकूण बाधित --  15960
घरी सोडण्यात आलेले ---  9021
मृत्यू -- 443
उपचारार्थ रुग्ण -- 6496

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...