यावर्षी जूनच्या सुरूवातीला चांगला पाउस झाल्याने परीसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पिकांची पेरणी उरकली. कोरोना व लॉकडाऊनचा सामना करत पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली. पेरणीनंतर मात्र पावसाने पंधरा ते वीस दिवस पाठ फिरवल्याने पिके पिवळी पडू लागल्याने दुबार पेरणी करावी लागते की काय? या चिंतेत बळीराजा होता पण आत्ता सुरू
झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे
आकाशात रोज ढग दाटून येत होते. मात्र पाऊस पडत नव्हता मात्र दोन दिवसापासून उकाडा होत होता. हवा बंद व दमट वातावरण निर्माण होऊन सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सायंकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली.
सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परीसरातील पिकांना मोठा आधार मिळाला. या जोरदार पावसामुळे तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण झाल्याने उष्म्याने हैराण झालेल्या नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पाऊस जोरदार असल्याने पिकांवरील काही प्रमाणात अळींचा प्रादुर्भाव कमी होईल, असे मत व्यक्त करत शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसले. यापुढे पर्जन्यमान चांगले राहून खरीप उत्पादन वाढण्याची शेतकरी वर्गास अपेक्षा आहे.
झालेल्या पावसाने प्रामुख्याने पेरणी झालेल्या सोयाबीन तसेच मका, भुुुईमूग या पिकाला मोठा फायदा होणार आहे. पर्जन्यवृष्टी झाली असल्याने खरीप पिकांना आधार लाभला आहे. त्यामूळे दुबार पेरणीच्या संकटातून सुटका झाल्याने शेतकºयांना दिलासा लाभला आहे. काही भागात विहिरींना देखील पाणी उतरण्यास प्रारंभ झाला असून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.
कुंभारगाव व परिसरात आतापर्यंत 80 ते 90 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यावर्षी शेतकºयांनी सोयाबीन लागवडीस अधिक प्राधान्य दिले असून त्यापाठोपाठ, भात,मका, भुईमूग लागवडीकडे शेतकºयांचा कल दिसून आला आहे.

प्रगतशील शेतकरी ;- तुकाराम माने
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा