मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

गुढे : शिबेवाडीच्या डोंगरावरील माता काळंबादेवीचा वार्षिक भंडारा रद्द

शिबेवाडीच्या डोंगरावरील माता काळंबादेवीचा वार्षिक भंडारा रद्द

तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यातील गुढे ग्रामपंचायत हद्दीतील वरची शिबेवाडीच्या डोंगरावरील जागृत देवस्थान समजल्या जाणाऱ्या माता काळंबादेवीचा बुधवार दि.12 आॅगस्ट, 2020 रोजी होणारा वार्षिक भंडारा जत्रोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर सदर भंडारा व इतर सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द केले आहेत. या भंडाऱ्यासाठी माहेरवाशिनी महिला तसेच परिसरातील अनेक भाविकांची मोठी गर्दी होते.
शिबेवाडी डोंगरावरील हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या काळंबादेवी मातेचा वार्षिक भंडारा या वर्षी बुधवार दि.12 आॅगस्ट, 2020 रोजी संपन्न होणार होता. त्यानिमित्त या मंदिरात ज्ञानेश्वरी अखंड हरिनाम पारायण सोहळयाचे आयोजन केले जाते. या पारायण सोहळयात दररोज काकड आरती, हरिपाठ, कीर्तन, भजन आदी र्धािर्मक कार्यक्रम होत असतात. त्यानंतर देवीची पालखी मिरवणूक, दहीहंडी फोडणे, महाप्रसाद वाटप इ. कार्यक्रम होतात. यंदा प्रथमच हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सांगतेच्या दिवशी दुपारी शिवरीच्या माळावर पाचुपतेवाडी येथील हनुमान देवाची पालखी आल्यानंतर दोन्ही पालख्यांची भेट होवून पालख्यांनी मंदिरात प्रदक्षिणा घातल्यानंतर दहीहंडी फोडली जाते. त्यानंतर महाप्रसाद वाटप होते. या दिवशी मेघराजा हमखास हजेरी लावतो असे म्हणतात. त्यावेळी पावसातही भाविक मोठया आनंदाने महाप्रसाद घेण्यासाठी रांगा लावतात. या भंडारा उत्सवासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबईतील देवीचे भाविक हमखास हजेरी लावतात. अत्यंत शांततेने आणि एकोप्याने हा भंडारा उत्सव साजरा होत असतो. परितसरातील सर्वजण या काळंबादेवीच्या भंडाऱ्याची वाट पाहत असतात.
कोरोनाच्या महामारीमुळे यंदा हा भंडारा रद्द होत असल्यामुळे सर्वजण त्या उत्सवाच्या अनंदाला मुकले आहेत.




Show quoted text

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

थकीत कर्ज न भरणाकेल्याने दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल.

कर्ज न भरणार्‍यास दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल. पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज मुदतीत...