मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

ग्रामपंचायत प्रशासक नियुक्तीसाठी विद्यमान सरपंच, सदस्य अपात्र

मुंबई ; राज्यातील मुदत संपलेल्या आणि डिसेंबरअखेर मुदत संपणार्‍या 14 हजारहून अधिक ग्रामपंचायतींवर नेमण्यात येणार्‍या प्रशासकपदासाठी सातवी उत्तीर्ण अशी अट आहे. तसेच विद्यमान सरपंच किंवा सदस्यांना प्रशासकपदासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

राज्यातील 19 जिल्ह्यातील 1566 ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून 2020 दरम्यान समाप्त झाली आहे. तर 12668 ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत संपत आहे.

अशा 14234 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. संबंधित जिल्हा पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने ग्रामपंचायत प्रशासक नेमण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

ग्रामविकास विभागाच्या या निर्णयाला महाराष्ट्र सरपंच परिषदेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने जेथे शक्य आहे तेथे प्रशासक म्हणून सरकारी अधिकारी नेमण्यास सांगितले आहे. सरकारी अधिकारी उपलब्ध नसल्यास खासगी व्यक्तीची नेमणूक करण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने प्रशासक पदासाठी कार्यपद्धती तयार केली आहे.

गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था

ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली आहे. या कार्यपद्धतीची माहिती उद्या, मंगळवारी उच्च न्यायालायला सादर करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

प्रशासकपदासाठी आवश्यक अटी

  • प्रशासक संबंधित गावातील रहिवाशी असावा.
    प्रशासकाला कोणत्याही गुल्ह्यात शिक्षा झालेली नसावी
  • गावकर्‍यांचा आक्षेप असेल तेथे सरकारी अधिकारी नेमण्यात येईल.
  • सरकारी अधिकारी उपलब्ध असल्यास त्यांना प्रशासक म्हणून नेमले जाईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...