मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

महिला पोलिसांसोबत ग्राहमंत्रानी साजर केलं रक्षाबंधन; पोलीस दल भारवलं ! काळगावच्या रूपाली डाकवे यांना मिळाला रक्षाबंधनाचा मान !

मुंबई ; या कोरोनाच्या कठीण काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपलं नाती, घरदाराचा विसर पडून आहोरात्र झटणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्यांसाठी आज दिवस खूप स्पेशल ठरला. आज रक्षाबंधनानिमित्ताने त्यांना त्याच्या हक्काचा मोठा भाऊ मिळाला. गृहमंत्री अनिल देशमुख आजपासून या महिला पोलिसांचे भाऊ झाले. गृहमंत्र्यांनी महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन साजरं केलं.
आज रक्षाबंधनच्यानिमित्ताने सर्व महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.त्यांची विचारपूस केली. कोविड-१९ च्या लढ्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढा देणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी कर्तव्याबरोबर सामाजिक जाणिवेतून लोकहित जपणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरं केलं.
गृहमंत्री अनिल देशमुख आणि रुपााली डाकवे

पोलीस दलातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा मोठा भाऊ या नात्याने मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने माझ्याकडून मनापासून खूप शुभेच्छा. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख नात्याने मला सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा बरोबरीने महाराष्ट्र पोलीस दलाचा सार्थ अभिमान आहे, असे मत गृहमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं.

फुटपाथवरील बेघर महिलेला प्रसुती करण्यास मदत करत तिला व तिच्या बाळाला सुखरूप दवाखान्यात भरती करणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया गरुड आणि महिला पोलीस शिपाई अस्मिता जाधव आणि रुपाली डाकवे या रक्षाबंधनच्या कार्यक्रमात उपस्थित होत्या. तसेच पनवेल नजिकच्या ज्ञानाई माध्यमिक विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांचा १० वी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलून त्यांना दत्तक घेणाऱ्या महिला पोलीस नाईक रेहाना शेख यांच्यासोबत मुंबईच्या रस्त्यांवरील अनेक निराधारांना मदतीचा हात देणाऱ्या महिला पोलीस नाईक रंजनी जबारे, तसेच एकाच दिवशी ४ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या महिला पोलीस नाईक संध्या शिलवंत उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...