रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

सातारा : अखेर सिव्हील सर्जन डॉ. अमोद गडीकर यांची बदली

सातारा दि.9.जिल्हा रुग्णालयाचे सिव्हील सर्जन असलेले डॉ. अमोद गडीकर यांच्या वाढत्या तक्रारी व कामाची पध्दत पाहून सातारा जिल्हा वैतागला होता. वांरवार त्यांच्याबाबतच्या तक्रारी वरिष्ठ पातळीवर झाल्या होत्या. अखेर त्या सर्व बाबींची दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी कराड येथील बैठीकीत त्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.

श्री गडीकर यांनी साताऱ्याचा कार्यभार घेतल्यापासून जिल्हा रुग्णालय दिशाहीन झाले होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्यात धुसपूस वाढली होती. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्यात  गट तट निर्माण झाले होते. परिणामी रुग्णालयाच्या कामावर त्याचा परिणाम होत होता.

याबाबत गडीकरांना सामाजिक व राजकीय संघटनांनी तसेच साताऱ्यातील माध्यमांनी जागे करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याविरोधात अनेकदा तक्रारींचा पाऊस पडला होता. त्या सर्व तक्रारींची दखल घेत राज्याच्या आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी कराड येथील बैठकीत  बदलीचे आदेश काढून त्यांची उचलबांगडी केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...