मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

*कुंभारगाव ; कोरोना योद्धा मानपत्र - ऑनलाईन प्रदान सोहळा संपन्न*

*कोरोना योद्धा मानपत्र - ऑनलाईन प्रदान सोहळा संपन्न*
दि. - ९ ऑगस्ट २०२०विश्वकर्मा प्रतिष्ठान, कुंभारगाव, ता. पाटण, जि. सातारा संलग्न 
अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ, जि. सातारा
आयोजित ऑनलाइन कार्यक्रमामध्ये
कोरोना योद्धा मानपत्र -- अभिनेत्री व पार्श्र्वगायिका सौ. मंजुश्री सुनील सुतार यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत कोविड-१९ या जीवघेण्या साथीमुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊन च्या काळात मिळालेल्या वेळेचा योग्य वापर करून सोशल मीडिया च्या साहाय्याने लहान बालक, त्यांचे पालक यांना बाल साहित्याची व गाण्यांची ओळख व्हावी, तसेच ज्ञान व मनोबल वाढावे आणि पर्यायाने समाज जागृती व्हावा यासाठी प्रयत्न केले, यामुळे त्यांनी समाजाप्रती असलेली जागरूकता सिद्ध केली आहे
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती :- मा. कविता राम (पार्श्वगायिका / अभिनेत्री), मा. शिवाजीराव सुतार (प्रदेश उपाध्यक्ष, सुतार समाज महासंघ), मा. सुदामराव दीक्षित (मा. जि. प. सदस्य, सातारा), मा. संजयजी भालेराव (संस्थापक, विश्वकर्मा स्वाभिमान परिवार), मा. अधिकराव सुतार (प्रसिद्ध वास्तुविशारद), मा. मोहनराव सुतार (प्रदेश सचिव, सुतार समाज महासंघ) हे होते. 
यावेळी आपल्या मनोगतात,
मा. कविता राम म्हणाल्या, विश्वकर्मा प्रतिष्ठान नेहमीच नवनवीन संकल्पना घेऊन कार्य करीत असते. ऑनलाईन कार्यक्रमाचे नियोजन खूपच उत्तम प्रकारे करण्यात आले. इथून पुढे प्रतिष्ठान च्या सर्व कार्यक्रमासाठी शक्य ती मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहू. कोरोना काळात सोशल मीडिया द्वारे कार्यक्रम घेऊन सोशल डिस्टंसिंग चा सदुपयोग केल्या बद्दल त्यांनी प्रतिष्ठान चे आभार व्यक्त केले. 
मा. अधिकराव सुतार यांनी कोरोना महामारी मध्ये कश्या प्रकारे आहार / व्यवहार केला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती दिली. 
मा. संजयजी भालेराव यांनी नारी शक्तीला शिक्षणाची जोड व योग्य मार्गदर्शन मिळाले की कोणत्याही क्षेत्रात उंच भरारी घेऊन पुरुषांपेक्षा सरस असल्याचे सिद्ध करू शकते हे नमूद केले.‌ तसेच प्रतिष्ठान ने आत्तापर्यंत केलेल्या समाजउपयोगी कार्याबद्दल सर्व पदाधिकारी यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. 
मा. शिवाजीराव सुतार यांनी समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. 

सौ. मंजूश्री सुतार यांनी सत्काराला उत्तर देताना मनोगतात सांगितले की प्रतिष्ठानने आयोजित केलेला कार्यक्रम हा वेळेचा सदुपयोग करून व कायद्याचे पालन करून सोशल डिस्टंसिन्ग चा उपयोग करून अतिशय नियोजन व शिस्त बद्द ऑनलाईन पद्धतीने केला आहे. हे सर्व प्रथम मला खूपच आवडलेले आहे. अश्याच प्रकारची सध्या सर्वाना गरज आहे, सर्वांनी सुरक्षित, स्वच्छता राखून राहिले पाहिजे. वेळेचा सदुपयोग समाज कल्याणासाठी केला पाहिजे. यापुढे प्रतिष्ठान च्या कोणत्याही कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा. विनायक वसंतराव सुतार यांनी केले. मानपत्र वाचन कार्याध्यक्ष मा. नितीन पोतदार सर यांनी केले. 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मा. भगवानराव सुतार, मा. अनिलभाऊ सुतार, मा. संदिपभाऊ पोतदार, मा. विनायक हणमंत सुतार, मा. प्रभाकरजी दीक्षित, मा. प्रदीपजी सुतार, मा. शालिवाहनजी सुतार, मा. सचिनजी सुतार, मा. ऋतुराज सुतार यांनी मोलाचे सहकार्य केले. आभार प्रदर्शन मा. जे. पी. सुतार सर यांनी केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा