शनिवार, २ मे, २०२०

सातारा : कराड हॉटस्पॉट,१ मे दिवसभरात तब्बल २४ नवे कोरोनाग्रस्त

कराड ;- मधील कोरोना बाधित म्हणून प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील १४ अनुमानित कोविड बाधित असल्याचे  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६९ वर पोहोचली आहे. यातील एकट्या कराड तालुक्यामध्ये तब्बल ५६ कोरोना बाधित रुग्ण असल्याने कराडकरांची चिंता वाढली आहे.

कराड मध्ये आज सकाळी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तसेच एका गर्भवती महिलेसह तिचा एक निकटवर्तीयाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर दुपारी पुन्हा २ जण कोरोनाग्रस्त असल्याची माहिती मिळाली.

नंतर  १ मे रोजी रात्री उशिराने पुन्हा कराड तालुक्यात कोरोनाचे नवे १४ रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात कराड मध्ये तब्ब्ल 24 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार कराड मध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता ५६ झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर यांनी सदर माहिती दिली आहे.

दि.१ मे सकाळी वेनुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे ६ आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने कराड वासियांसाठी हि धोक्याची घंटा मानली जात आहे. यामुळे कराड वासियांची झोप उडाली असून प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...