नवी दिल्ली : कोरोनाचे दिवसेंदिवस वाढते रुग्ण पाहता केंद्र सरकारनं लॉकडाऊननंतर आता आणखी विविध उपाययोजनांना सुरूवात केली आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक वस्तुंचा तुटवडा नागरिकांना जाणवू नये यासाठी आता देशभरातील सर्व टोलनाक्यांवरील टोलवसुलीला स्थगिती देत असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
या निर्णयामुळे अत्यावश्यक वस्तुंच्या वाहतुकीतील मोठा अडथळा दूर होऊन वेळेचीही बचत होईल असं नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. देशातील सर्व राष्ट्रीय आणि राज्यमार्गांवरील टोलवसुली स्थगित करण्यात आली आहे. देशभरात सध्या कोरोनाबाधीतांची संख्या आता ६०६ झाली आहे, यात ४०च्यावर नागरिक हे परदेशी आहेत.
लॉकडाऊननंतर धान्याच्यी उपलब्धता करुन देण्यात येणाऱ्या अडचणींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी हा निर्णय़ घेण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा