जिल्ह्यातील कोरोना रिपोर्ट :
जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्ण : 16
रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले रुग्ण : 2रिपोर्ट निगेटिव्ह आलेले रुग्ण : 14
रिपोर्टची प्रतीक्षा असलेले रुग्ण : 00
निगेटिव्ह रिपोर्टमुळे घरी सोडलेले रुग्ण : 10
रुग्णालयात उपचार सुरू असलेले रुग्ण : 6
निरीक्षणाखाली असलेल्या व्यक्ती : 369
14 दिवसांचा कालावधी संपलेले रुग्ण : 121
घरातच निरीक्षणाखाली असलेले नागरिक : 248 रुग्णालयात दाखल रुग्ण : १६
रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले रुग्ण : २
रिपोर्ट निगेटिव्ह आलेले रुग्ण : १४
रिपोर्टची प्रतीक्षा असलेले रुग्ण : ००
निगेटिव्ह रिपोर्टमुळे घरी सोडलेले रुग्ण : १०
रुग्णालयात उपचार सुरू असलेले रुग्ण : ६
निरीक्षणाखाली असलेल्या व्यक्ती : ३६९
१४ दिवसांचा कालावधी संपलेले रुग्ण : १२१
घरातच निरीक्षणाखाली असलेले नागरिक : २४८
कोरोना विषाणू हा अत्यांत लवचिक आहे. तो जर भारतातील उन्हाळ्यानंतर अस्तीत्वात राहिला तर माणसाकडून माणसात प्रसार होण्याचे प्रमाण वाढेल, असा इशारा भारतीय जीवशास्त्रज्ञांच्या पथकाने दिला आहे.
भारतीय पथकाला सार्स सीओव्ही 2च्या स्पाईक प्रोटीनमध्ये अन्य देशात आढळलेल्या विषाणूंच्या तुलनेत फरक आढळलेला आहे. याचा अर्थ तो मानवी पेशीत प्रवेश करताना आणि जोडताना त्याची वर्तणूक वेगळी असते. आता पर्यंत त्याची संसंर्ग क्षमता मोठी असल्याचे सिध्द झाले आहे. आणि जर तो येणाऱ्या भारतीय उन्हाळ्यात तगला तर तर माणसातून माणसाकडे होणऱ्या संसर्गाची संख्या वाढू शकते, असे डॉ. दिनेश गुप्ता यांनी सांगितले.ते दिल्लीतील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरींग आणि बायोटेक्नॉलॉजी या इटलीत मुख्यालय असणाऱ्या संशोधन संस्थेचे प्रमुख आहेत. सार्स - सीओव्ही 2 हा विषाणू खूप लवविक आहे. त्यामुळे त्याचा संसर्ग रोखणे हे खूप महत्वाचे आहे, असे सांगत डॉ. गुप्ता यांनी भारत सरकारने केलेल्या उपाय योजनांचे समर्थन केले.
वेगवेगळ्या स्थितीशी जुळवून घेण्याची त्यात तगून राहण्याची आणि मानवी पेशीत प्रवेश करण्याची विषाणूंची सर्वसाधारण प्रवृत्ती असते, असे मतही गुप्ता यांनी नोंदवले. भारत, इटली, वूहान, अमेरिका आणि नेपाळ अशा विविध ठिकाणच्या विषाणूंबाबत ही संस्था संशोधन करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा