सातारा, २६ मार्च, : कोविड-19 या आजाराने बाधित असलेल्या रुग्णांच्या कुटुंबातील 7 निकट सहवासितांचे तसेच एका 60 वर्षीय महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुनेही एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले होते त्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून हे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे.
तसेच फिनलॅड येथून प्रवास करुन आलेल्या 32 वर्षीय युवकाला अनुमानित रुग्ण म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला आहे, अशीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा