रविवार, २९ मार्च, २०२०

पाटण :- बाटलीतून पेट्रोल विक्री करणार्‍या कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

बाटली अथवा कॅनमधून पेट्रोल विक्री करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश असतानाही नाडे नवारस्ता, ता. पाटण येथील तालुका खरेदी-विक्री संघाच्या पंपावर कर्मचारी बेकायदेशीर प्लास्टिक बाटलीतून पेट्रोल विक्री केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पेट्रोलपंप कर्मचार्‍यांंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्मचारी विकास जयवंत चव्हाण रा. गमेवाडी, ता. कराड व शाखाप्रमुख नारायण लक्ष्मण जाधव रा. गव्हानवाडी, ता. पाटण याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पेट्रोल पंप मालक-चालक आणि प्रांताधिकारी यांच्या समेवत झालेल्या बैठकीत शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून पेट्रोल विक्री करावी.

कोणालाही बाटली अथवा कॅनमधून पेट्रोल देण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

शनिवारी रात्री पाटण तालुका खरेदी-विक्री संघाच्या म्हावशी व नाडे नवारस्ता येथील पेट्रोल पंपांना पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी अचानक भेटी दिल्या. त्यावेळी नाडे-नवारस्ता येथील पंपावर कर्मचारी कॅन व प्लास्टिक बाटलीतून पेट्रोल देत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पेट्रोल घेणारे ग्राहक पळून गेले.

मात्र, याबाबत विचारणा केली असता कर्मचारी समाधानकारक उत्तर देता आले नाही. याप्रकरणी पाटण येथील पुरवठा शाखेचे उप लेखापाल महादेव अष्टेकर यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संतोष कोळी करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...