सोमवार, ३० मार्च, २०२०

सांगली : एका कुटुंबातील 24 जणांना कोरोनाची लागण, 2 वर्षीय चिमुकल्याचा पण समावेश

सांगलीत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आत्ता २४ झाला आहे आहे. एकाच कुटुंबातील अनेकांना कोरोनाचा विळखा पडला आहे. नुकताच कोरोना पॉझिटिव्ह आलेला २ वर्षांचा मुलगा त्याच कुटुंबातील असून यापूर्वी देखील या घरातील लहान मुलांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. मात्र त्यावेळी ते निगेटिव्ह होते. काल तिघांचे रिपोर्ट पाठवले त्यात एका मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

सांगलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एकाच कुटुंबातील नातेवाईकांसह २४ जण आहेत. तर पेट वडगाव येथील महिला इस्लामपूर येथील रुग्णाची नातेवाईक आहे. या सर्व रुग्णांवर मिरजमधील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

मिरजमध्ये उपचार घेणाऱ्या संख्या २५ वर पोहचली आहे.
संख्या वाढत असताना दिलासादायक माहिती सांगली जिल्हातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण याआधीही महाराष्ट्रात अनेक कोरोनाबाधितांवर उपचार होऊन त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...