रविवार, २९ मार्च, २०२०

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 196 - राजेश टोपे


मुंबई प्रतिनिधी :-

महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 196 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात कालपर्यंत 186 कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यात आज (रविवारी) आणखी दहा नव्या रुग्णांची भर पडली.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची विभागनिहाय आकडेवारी देखील टोपे यांनी दिली. मुंबई व ठाणे परिसर 107, पुणे 37, नागपूर 13, अहमदनगर 03, रत्नागिरी 01, औरंगाबाद 01, यवतमाळ 03, मिरज 25, सातारा 02, सिंधुदुर्ग 01, कोल्हापूर 01, जळगाव 01, बुलढाणा 01 असे हे रुग्ण आढळून आल्याचे टोपे यांनी सांगितले.

राज्यात एकूण सहा कोरोनाबाधित रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून हे सर्वजण मुंबईतील होते, अशी माहिती टोपे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...