बुधवार, ४ मार्च, २०२०

शशिकांत शिंदे पुत्राच्या उमेदवारीची नवी मुंबईत चर्चा

नवी मुंबई प्रतिनिधी :-

कोरेगाव मधील पराभवानंतर शशिकांत शिंदे यांनी आपले लक्ष आता नवी मुंबईच्या राजकारणाकडे वळविले आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आपल्या मुलाला उमेदवारी देऊन त्याच्या राजकारणाचा श्रीगणेशा करणार असल्याची चर्चा आहे.

यावेळची विधानसभा निवडणूक शशिकांत शिंदे यांच्या अनपेक्षित पराभवाने चर्चेत राहिली. कोरेगाव मतदारसंघातील पराभव शशिकांत शिंदे यांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र नव्या राजकीय समीकरणामुळे आता मतदारसंघावरून त्यांची पकड सैल झाली आहे. त्यामुळे आपल्या मुलाला नवी मुंबईच्या राजकारणात सक्रिय करण्याचा त्यांचा इरादा आहे.

तेजस शिंदे यांनी देखील नवी मुंबईत ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन याबाबतचे संकेत दिले आहेत. अशातच माथाडी कामगारांचे वर्चस्व असलेल्या वाशी मधील वॉर्ड क्रमांक ६३ मधून तेजस शिंदे निवडणूक लढतील असे मानले जाते. या प्रभागात संपत शेवाळे यांचा प्रभाव आहे. काँग्रेसचे अनिल कौशिक हे देखील याच प्रभागातून इच्छुक आहेत. अशातच तेजस शिंदे यांची या प्रभागाची चर्चा सुरु झाल्याने या प्रभागात हाय होल्टेज लढत होणार हे मात्र नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...