सीआरपीसी अंतर्गत येणारे कलम 144 कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी लागू केले जाते. जमावबंदीचा आदेश लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी देतो. जमावबंदी लागू केल्यानंतर 4 किंवा त्यापेक्षा अधिक लोक एका ठिकाणी जमू शकत नाहीत. तसेच शस्त्र घेऊन जाण्यास देखील बंदी असते.
कलम 144 चे पालन न केल्यास पोलीस त्या व्यक्तीला अटक करू शकतात. त्या व्यक्तीला कलम 107 किंवा कलम 151 अंतर्गत अटक करण्यात येते. जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्याला 1 वर्षांची शिक्षा होऊ शकते. मात्र या शिक्षेसाठी जामीन मिळतो.
सीआरपीसी म्हणजेच भारतीय दंड विधान (Code of Criminal Procedure, 1973) भारतातील गुन्ह्यांसाठी कायदे आहेत.हे 1973 ला पारित करण्यात आले व 1 एप्रिल 1974 मध्ये लागू करण्यात आले. एखाद्या गुन्ह्यात आरोपी आणि पिडितासाठी जी प्रक्रिया राबवली जाते ती सीआरपीसीमध्ये देण्यात आलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा